रत्नागिरीत सहा महिन्यांच्या बाळाला कोरोना | पुढारी

रत्नागिरीत सहा महिन्यांच्या बाळाला कोरोना

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरीमधील साखरतर येथील ६ महिन्याच्या बाळाचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

कोरोनाबाधित महिलेच्या घरातील हे बाळ आहे. यामुळे रत्नागिरीकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आता रत्नागिरीत कोरोना रुग्णांची संख्या ६ वर जाऊन पोहोचली आहे.

जिल्ह्यात ‘होम क्वारंटाईन’ 1,086 व्यक्ती आहेत. लॉकडाऊन वाढविण्याच्या पार्श्वभूमीवर सर्वांवर अधिक लक्ष देण्यात येत आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस दलातर्फे विकसित अ‍ॅपची मदत घेण्यात येत आहे. जिल्ह्यात संस्थात्मक क्वारंटाईन खाली असणार्‍यांची संख्या 274 आहे. यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयात 64, उपजिल्हा रुग्णालय कामथे 2, उपजिल्हा रुग्णालय, कळंबणीमध्ये 29 व अन्य तालुक्यांंचा समावेश आहे.

Back to top button