कोरोना; पनवेलचा आकडा पोहोचला ३२ वर | पुढारी

कोरोना; पनवेलचा आकडा पोहोचला ३२ वर

पनवेल : पुढारी वृत्तसेवा

पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत दिवसेंदिवस रुग्णांची वाढ होताना दिसून येत आहेत. सोमवारी पनवेल शहरात रुग्ण आढळून आल्याची घटना समोर आल्यानंतर आज पनवेल महानगरपालिका हद्दीत एकूण ३ नवीन रुग्णाची वाढ झाली आहे. त्या मध्ये पनवेल शहरात दोन रुग्ण आढळून आले आहे. ते घोटगावात एका इसमाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तळोजा परिसरातील हा दुसरा रुग्ण असल्यामुळे आता तळोज्याच्या चिंतेत भर पडली आहे. तर पनवेल महागरपालिकेच्या हद्दीत नवीन २ रुग्ण आढळल्याने कोरोना रुग्णांची संख्या मंगळवार पर्यत ३२ पर्यत पोहोचली आहे. त्यामध्ये पनवेल ग्रामीण भागात ६ रुग्ण आढळले आहे.

वाचा : मुंबई : व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिनला पोलिसांकडून मार्गदर्शिका

देशासह महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्यानंतर, पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील कामोठे वसाहतीमध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर अगदी दिवसां आड पनवेल पालिका हद्दीत एक एक नवीन रुग्ण आढळून आला आहे. त्यात कळंबोली वसाहती मध्ये एकाच दिवशी ५ कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर हा आकडा वाढत गेला आणि पुन्हा कळंबोली ६ नवीन रुग्ण आढळून आले. त्यानंतर खारघर परिसरात एका दिवसाआड करत ६ रुग्ण नव्याने आढळून आले आहे. या मधील एकाच रुग्णाला ट्रॅव्हल हिस्ट्री आहे.

वाचा :मुंबईत परप्रांतियांची गर्दी; आदित्‍य ठाकरेंचा केंद्र सरकारवर निशाणा 

मात्र अन्य रुग्ण हे कॉमन असून, या वसाहतीमधील रहिवाशी आहे. असे करत आज पनवेल महानगरपालिका हद्दीत सोमवारपर्यत २३ रुग्ण आढळून आले होते. मात्र मंगळवारी पालिका हद्दीतील तळोजा विभागातील (घोट गावात) एक रुग्ण आढळून आला आहे. तो घोट कॅम्पमधील चाळीत राहणार रहिवाशी असल्याचे सांगितले जात आहे. तसेच तो कामगार असल्याचे बोलले जात आहे. सध्या त्याची तपासणी केली असता तो कोरोना बाधीत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर सायनमधील रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्याचसोबत सोमवारी पनवेल शहरातील एका ओला चालकाला कोरोनाची लागण झाली होती, त्याच्या कुटूंबातील १० सदस्यांची तपासणी केली असता त्या कुटूंबातील दोन सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्यावर आता उपचार सुरू केले आहेत. त्यापैकी ६ सदस्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. आणि २ सदस्याचे रिपोर्ट प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे पनवेल महानगरपालिका हद्दीतील रुग्णाची संख्या २६ वर पोहोचली असून, पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातील ६ रुग्ण पकडून ही संख्या आता ३२ वर पोहोचली आहे.

पनवेल महानगरपालिका हद्दीत एकूण २६ रुग्ण आहेत त्या पैकी २१ ते ४० वयोगटातील १४ रुग्ण आहेत. तर ४१ ते ६० या वयोगटातील ६ रुग्ण आहेत. तर ६१ आणि त्या पेक्षा अधिक वयोगटातील २ रूग्ण हे पालिका हद्दीत आहे. त्या सोबत या कोरोना विषाणूंची लागण महिला पेक्षा पुरुषांना जास्त असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार १९ पुरुष आणि फक्त ३ महिलांना या आजाराची लागण झाली आहे.

कोरोनाची लागण झालेल्या वयोगट खालील प्रमाणे

 वयोगट

१.       २१ ते ४१ वय      १४

२.      ४१ ते ६० वय        ०६

३.    ६१  आणि त्या पेक्षा अधिक   ०२

वाचा : ‘वांद्रे स्टेशनबाहेर हजारोंची गर्दी जमेपर्यंत पोलिस काय करत होते?’ 

पुरुष आणी महिलांची संख्या

१. पुरुष  १९

२ महिला  ०३

पनवेल महानगरपालिका हद्दीतील रुग्ण संख्या

एकूण संख्या २६

१. कामोठे   ०३

२. कळंबोली- सीआयएसफ  ११

                    महिला  ०१

३. खारघर ०६

४. पनवेल शहर  ०३

५. तळोजा ०२

एकूण २६ रुग्ण

पनवेल ग्रामीण : उलवे  ०४

                        उरण  ०२

                       एकूण  ०६

पनवेल महानगरपालिका रुग्ण आणी पनवेल ग्रामीण रुग्ण एकूण ३२

 

Back to top button