बारामती : माळेगावातील कोरोनाग्रस्ताचा मृत्यू | पुढारी

बारामती : माळेगावातील कोरोनाग्रस्ताचा मृत्यू

बारामती : पुढारी वृत्तसेवा 

माळेगावातील लकडेनगर भागातील रहिवाशी असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाचा आज, शनिवारी (दि.२५) म्रूत्यू झाला. बारामतीतील आजवर एकूण दोन कोरोनाग्रस्त मृत्यूमुखी पडले आहेत. बारामती शहरातील भाजी विक्रेत्याचा यापूर्वी कोरोनाने मृत्यू झाला होता. 

वाचा : पुणे : ससूनमधील असिस्टंट मेट्रनचा मृत्यू

दरम्यान, शुक्रवारी (दि.२४) रोजी माळेगावातील लकडेनगर भागातील एका ज्येष्ठाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे बारामती तालुक्यातील रुग्णसंख्या आठ झाली होती. किडनीच्या विकाराने ग्रस्त असलेल्या या रुग्णाला १६ एप्रिल रोजी डायलिसिस करण्यासाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. त्या वेळेस त्याला कोरोनाची कसलीही लक्षणे नव्हती, मात्र गुरूवारी दि.२३ रोजी त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांच्या घशातील द्रावाचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालानंतर स्पष्ट झाले होते. बारामतीतील आठ रुग्णांपैकी दोघांचा मृत्यू झाला असून पाचजण कोरोनामुक्त झाले आहेत. एका रुग्णावर अद्याप उपचार सुरु आहेत. 

वाचा : पुणे : रास्तभाव दुकांनासाठी पोलिसांकडून नियमावली

Back to top button