कडेगाव तालुक्यामध्ये १३,७०० जण होम क्वारंटाईन    | पुढारी

कडेगाव तालुक्यामध्ये १३,७०० जण होम क्वारंटाईन   

कडेगाव : पुढारी वृत्तसेवा 

तालुक्यात आतापर्यंत प्रशासन व आरोग्य खात्याने बाहेरगावच्या 13,700 लोकांना होम  क्वारंटाईन केले आहे. यामध्ये सर्वाधिक लोक हे मुंबई, पुणे शहरातून आलेले आहेत. तर 26 लोकांना संस्थात्मक क्वॉरंटाईन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने तालुक्यात लोकांचे स्थलांतर झाले आहे.

तालुक्यात आतापर्यंत भिकवडी येथे पाच , सोहोली येथे दोन  आंबेगाव येथे एक तर खेराडे-वांगी येथे एक असे एकूण नऊ रुग्ण आढळून आले आहेत. तर एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 

तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी  प्रशासनाच्या वतीने युद्ध पातळीवर उपाय योजना सुरू आहेत.  महसूल विभाग ,आरोग्य विभाग, पोलिस खाते व अन्य प्रशासकीय कार्यालये कोरोना विरोधात लढा देताना दिसत आहेत. परंतु सध्या तालुक्यात बाहेरगावाहून येणार्‍या नागरिकांची संख्या मोठी आहे.

आतापर्यंत  तब्बल 15 हजारहून अधिक लोक मुंबई, पुणे सह अन्य ठिकणहून दाखल झाले आहेत.बाहेरगावच्या 13 हजार 700 लोकांना प्रशासनाने  क्वारंटाईन  केले आहे.  या लोकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करून घरातच राहणे गरजेचे आहे.   

Back to top button