मधुमेह आणि घ्यायची काळजी | पुढारी | पुढारी

मधुमेह आणि घ्यायची काळजी | पुढारी

भारत हा देश जगात मधुमेहामध्ये क्रमांक दोनचा देश आहे. साधारणतः आज रोजी आपल्या देशात चार कोटी लोक या आजाराने ग्रस्त आहेत. WHO च्या अहवालानुसार जर वेळीच काळजी घेतली नाही तर सन 2030 पर्यंत आपण प्रथम क्रमांकाचा देश होऊ WHO च्या वर्गीकरणानुसार मधुमेहाचे खालील प्रमाणे प्रकार होतात.

1) इन्सुलीन डिपेडंट डायबेटीस (IDDM)

2) नॉन- इन्शुलीन डिपेडंट डायबेटीस (NIDDM) 

3) कुपोषण संबंधित डायबेटीस (MDM) 

4) अनुवंशिकता किंवा अवयवातील दोष किंवा औषधांमुळे होणारा डायबेटीस

तर अशा या आजाराला वेळीच ओळखण्यासाठी फक्‍त आपल्याला रक्‍ताची चाचणी करावी लागते. BSL (fasting) म्हणजे उपाशीपोटी आणि BSL (PP) म्हणजे जेवणानंतर 2 तासांनी करावयाची चाचणी. कधी-कधी जास्त शुगर वाढली असेल तर युरिन टेस्ट म्हणजे लघवी तपासणीत सुद्धा आपल्याला साखर आढळून येते. मधुमेहास आम्ही वैद्यकीय भाषेत ‘सायलेंट किलर’ असे संबोधतो, म्हणजे एकदा हा आजार झाला कि हळूहळू बाकी सारे आजार आपल्या शरीरामध्ये डोकावू लागतात. म्हणजे आपले शरीर हे रोगांचे ‘माहेरघर’ बनते.

 सर्वसाधारणपणे मधुमेहाची लक्षणे खालील प्रमाणे आहेत 

1) खूप भूक लागते.

2) वारंवार लघवीला होते.

3) वाजन कमी अथवा जास्त होते

4) लघवीला मुंग्या लागतात

5) सतत संसर्ग होतो. 

मधुमेह कोणालाही होऊ शकतो सर्व वयोगटातल्या लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणाही स्त्री-पुरुषाला हा आजार होऊ शकतो. ते पुढीलप्रमाणेः-

1) अनुवंशिकता- म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये कोणाला मधुमेह असेल तर आपणास होणेची जास्त शक्यता आहे. 

2) अयोग्य जीवनशैली- बदलती व अत्युच्च जीवनशैली जगल्यामुळे याचा धोका वाढतो.

3) व्यायामाच्या अभावामुळे वजन वाढते व मधुमेह, ब्लड,-प्रेशर व हृदयरोग होऊ शकतो.

4) रासायनिक प्रक्रिया केलेले अन्‍न, पालेभाज्या, फळे, ड्रिंक्स घेतलेने मधुमेह होऊ शकतो.

5) व्यसनाधीन असलेल्या लोकांना उदा. अल्कोहोल, सिगारेट, ड्रग्जच्या आहारी गेलेल्यांना याचा धोका अधिक असतो.  

मधुमेहाचे आपल्या शरीरावर होणारे गंभीर परिणाम –

1) डायबेटिक रेटिनोपॅथीमध्ये डोळ्यांची नजर कमी होते.

2) डायबेटिक न्युरोपॅथीमध्ये पाय, हात, मज्जातंतू बधीर व सूंद होतात. त्यामुळे संवेदना नष्ट होते.

3) डायबेटिक नेफ्रोपॅथीमध्ये किडनीचे गंभीर आजार होतात.

4) हृदयरोगाचे प्रमाण वाढते.

5) शरीराच्या जखमा लवकर बर्‍या न झाल्यामुळे तेथे जंतुसंसर्ग होऊन परिणामी तो अवयव कापून टाकावा लागतो.

थोडक्यात रोगी, मधुमेहाच्या आजारामुळे नाही तर त्याच्या होणार्‍या शरीरातील गुंतागुंतीमुळे दगावतो. म्हणून याला वेळी नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.

आपणास दुर्दैवाने जर याची लागण झाली असेल तर मुळीच घाबरता कामा नये. तज्ज्ञ डॉक्टरांच्या व आहारतज्ज्ञ सल्ल्याने आपण आपला मधुमेह पूर्णतः नियंत्रणात ठेवू शकातो व आनंदी जीवन जगू शकतो व त्याचे दुष्परिणाम टाळू शकतो. 

वरील सर्व गोष्टी मानवनिर्मीत आहेत आणि आपण त्या पूर्णतः टाळू शकतो व निरोगी जीवन जगू शकतो “”Prevention is better than cure”म्हणजे “प्रतिबंध हाच उपाय” आहे. कारण हल्‍लीच्या जगात सर्वात मौल्यवान संपत्ती आपले आरोग्य आहे. 

Back to top button