हे पाच घरगुती उपचार जे उष्णतेपासून आराम देतील… | पुढारी

हे पाच घरगुती उपचार जे उष्णतेपासून आराम देतील...

पुढारी ऑनलाईन डेस्क 

उन्हाळ्यात होणारी अंगाची लाहीलाही, डोळ्यांतील जळजळ आणि अंगाला खाज यापासून तुम्हाला सुटका करून घ्यायची आहे? तापमान वाढीमुळे घामोळ्या आले असतील तर दिवसातून कमीत कमी दोन वेळा अंघोळ करा. असे करूनही त्रास कमी झाला नाही तर, पुढील घरगुती उपचार करा, जे उष्णतेपासून तुम्हाला आराम देतील. 

त्वरीत आरामासाठी 

घामोळ्या खूप त्रास देत असतील तर त्वरित आराम मिळविण्यासाठी आपण २ ते ३ बर्फाचे खडे (आईस क्युब) घ्या आणि ते एका स्वच्छ रूमालात गुंडाळून आपल्या पाठीवर आलेल्या घामोळ्यांवर हळूहळू फिरवा. असेच दिवसातून किमान दोन वेळा ५ ते १० मिनिटासाठी करा. आपल्याला आराम मिळेल. 

पपई आणि गहू पीठ

पपई आपल्या त्वचेला थंड करते आणि गहूचे पिठ हे घामोळ्यांचे डेड सेल्स हटविण्याचे काम करतं. हे तयार करणं ही सोपं आहे. यासाठी आधी एक पिकलेलं पपई घ्या. त्याची एक मध्यम आकारातील तुकडा कापून घ्या. त्यानंतर त्या पपईची पेस्ट बनवून त्यात गहूचे पीठ घाला. हे मिश्रण घामोळ्यांवर लावा. यानंतर हलक्या हाताने मसाज करा. अंघोळ करा. असे आपण दिवसातून दोनदा करू शकता. तर रात्री असे केल्यास आपल्याला झोप चांगली येईलच त्याचबरोबर तुमच्या अंगावर घामोळ्यांमुळे काळे डाग ही पडणार नाहीत. 

थंड दह्याचा मसाज

उन्हाळ्यात त्रासदायक ठरणाऱ्या घामोळ्यांवर थंड दही खूप लाभदायक ठकते. त्यासाठी आपण आर्धी वाटी दही घ्या. त्यात ६ ते ७ पुदीन्याची पाने वाटून टाका. हे तयार झालेली पेस्ट १० मिनिटं घामोळ्यांवर लावा. हा उपाय लहान मुलांसाठी गुणकारी असून सुरक्षितही आहे. यामुळे लहान मुलांच्या त्वचेला कोणतीही हानी पोहचत नाही. 

असे लावा काकडीची पेस्ट

आपल्याला घामोळ्या दूर करायाच्या असतील. त्वचा थंड आणि चमकदार हवी असेल तर हा उपाय नक्की करू शकता. यासाठी एक काकडी घ्या. त्याची पेस्ट करून त्यात एक चमचा चंदन पावडर मिक्स करा. ही पेस्ट किमान २० मिनिटं फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर ही पेस्ट घामोळ्यांवर लावून सुखू द्या. त्यानंतर आंघोळ करा. आपल्या आराम मिळण्याबरोबरच त्वचा थंड आणि चमकदार होईल.

ओटमील आणि दुधाचा लेप

घामोळ्या घालवण्यासह त्वचा मऊ आणि चमकदार करण्यासाठी ओटमील आणि दुधाचा लेप लावा. अर्धी वाटी थंड दूध घ्या. त्यात १ चमच्या  ओटमील घाला. ओटमील आणि दुधाचे मिश्रण अर्धा तास फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर हे मिश्रण १० ते १५ मिनिटांसाठी घामोळ्यांवर लावून हलका मसाज करून नंतर अंघोळ करा. असे आपण दिवसातून २ ते ३ वेळा करू शकता. ओटमील आणि दुधाचा लेप हा आपल्यासह घरातील लहान मुलांसाठी फार उपयुक्त ठरेल. 

Back to top button