तिरळेपणाकडे दुर्लक्ष नको | पुढारी | पुढारी

तिरळेपणाकडे दुर्लक्ष नको | पुढारी

तिरळेपणाला  स्क्विंट किंवा स्ट्राबिस्मस किंवा क्रॉस्ड आईज असेही म्हटले जाते. हा डोळ्यासंबंधी एक विकार आहे. यात दोन्ही डोळे एकाच कोनात राहात नाहीत. यावर तातडीने उपचार केल्यास हा आजार लवकर बरा होतो. 

सामान्य व्यक्तीच्या दोन्ही डोळ्यांच्या बाहुल्यांत चांगला समन्वय आणि ताळमेळ असतो. दोन्हीही एकाच दिशेने आणि एकाच बिंदूवर फोकस करत असतात. मात्र काही मुलांना जन्मजात तिरळेपणा असतो. त्यामुळे मेंदूला दोन्ही डोळ्यांकडून वेगवेगळे दृष्य पोचवले जातात. कमकुवत डोळ्यांकडून मिळणार्‍या संकेताकडे मेंदू दुर्लक्ष करतो. जर मेंदूने दोन्ही संदेशांचे आकलन केले तर डबल व्हिजनची समस्या उदभवते. प्रामुख्याने ही समस्या लहान मुलांत असते. मात्र त्यावर उपाय करता येणे शक्य आहे. 

तिरळेपणा हा एखाद्या दुर्घटनेत डोळ्यांना मार लागणे किंवा अन्य आरोग्यातील समस्येमुळे निर्माण होऊ शकतो. ही समस्या मांसपेशीवरच्या खराब नियंत्रणामुळे निर्माण होते. कारण त्यांना तंत्रिकांचे सदोष संकेत मिळत राहतात. परंतु हा आजार असाध्य किंवा अशक्य असा नाही.  

जन्मजात विकार, अनुवंशिकता, दुर्घटना, डोळ्यांशी निगडीत आजार, संसर्गाची बाधा आणि अन्य आरोग्याशी संबंधित आजारपण यामुळेही तिरळेपणा येऊ शकतो. वास्तविक तिरळेपणावर कधीही उपचार करता येतात. पण सुरवातीच्या काळात वेळीच उपचार केल्यास त्याचा परिणाम चांगला राहतो. स्थिती गंभीर झाल्यास त्यावर संपूर्णपणे उपचार करता येत नाही. साधारणपणे सहा वर्षाच्या वयापर्यंत त्यावर उपचार केल्यास रुग्णाला लाभ होतो. 

डोळ्याचे व्यायाम

अनेक व्हिजन थेरेपीत तिरळेपणावरील उपचारांचा समावेश केला आहे. डोळ्यातील समन्वय विकसित करण्यासाठी हा व्यायाम मदत करतो. डोळ्यांच्या पेशी मजबूत करण्यासाठी देखील व्यायाम उत्तम आहे. हा व्यायाम रुग्णालयातील एका मशिनवरही करता येतो. त्याला ‘सायनोफ्टोफोरे’ असेही म्हणतात.  

तिरळेपणा करेक्टिव्ह लेन्सेस जसे की चष्मा किंवा कॉन्टॅट लेन्सच्या माध्यमातूनही दुरुस्त करता येतो. ज्या डोळ्यात तिरळेपणा अधिक आहे, त्यात आय पॅचचा वापर करुन दृष्टी चांगली करता येते.  पण अशा उपायांतून तिरळेपणा कमी होत नसेल तर ऑपरेशन करणे हिताचे ठरेल. ऑपरेशनच्या मदतीने डोळे रि-अलाइन केले जातात आणि बायनोक्यूलर व्हिजन प्रस्थापित केले जाते. 

 

Back to top button