लालपिसांचा  ब्लॅक बर्ड | पुढारी | पुढारी

लालपिसांचा  ब्लॅक बर्ड | पुढारी

के वळ कावळाच काळ्या रंगाचा असतो असे काही नाही. लाल पिसांचा ब्लॅक बर्ड हा पक्षीही कावळ्याप्रमाणे काळा असतो पण त्याची पिसे चमकदार लाल रंगाची असतात. मध्य ते उत्तर अमेरिकेत आढळणारा हा पक्षी सर्वात जास्त अभ्यासला गेलेला पक्षी आहे.

नर ब्लॅक बर्डचे पंख लाल असतात व त्यांना शेवटी पिवळसर झाक असते. तर ब्लॅक बर्डची मादी तपकिरी रंगाची असते. बिया व छोटे कीटक असा आहार असलेल्या या पक्ष्याला गवताळ जमीन विशेषत: पाणथळ जागा आवडते. गोड्या पाण्याची सरोवरे किंवा समुद्री खाड्या अशा दोन्ही ठिकाणी हा पक्षी राहू शकतो. शक्यतो थव्याने राहणे हा पक्षी पसंत करतो.

या पक्ष्याची मादी रकून, कोल्हा, मिंक व साप अशा नैसर्गिक शत्रूंना सहजासहजी दिसणार नाही अशा ठिकाणी गवतात किंवा झुडपातील   घरट्यांमध्ये आपली अंडी घालते. पूर्ण वाढ झालेल्या ब्लॅक बर्डची लांबी 24 सें.मी. पर्यंत असते तर वजन सुमारे 85 ग्रॅम असते.
 

संबंधित बातम्या

Back to top button