बाल वीर : सिद्धेश मंजुनाथ | पुढारी

बाल वीर : सिद्धेश मंजुनाथ

15 मार्च 2015, कर्नाटकातील दावणगिरी जिल्ह्यातील एका छोट्या खेड्यातून हरिहर चित्रदुर्ग ही पॅसेंजर ट्रेन नेहमीप्रमाणे वार्‍याशी स्पर्धा करत धावत होती. इतक्यात रेल्वे गाडीच्या चालकाचे लक्ष लांब अंतरावरून रुळावर धावणार्‍या एका लहान मुलाकडे गेले. तो मुलगा लाल कपडा हाताने फडकवत रेल्वेच्या दिशेने धावत येत होता. रेल्वेच्या चालकाने लगेच इमर्जन्सी ब्रेक दाबत गाडी थांबवली व एक मोठा रेल्वे अपघात टळला. 10 वर्षांच्या सिद्धेश मंजुनाथ या मुलाच्या प्रसंगावधानामुळेच हा अपघात टळला. हरिहर चित्रदुर्ग पॅसेंजर येण्यापूर्वी सिद्धेशने दोन रुळांना सांधणारा जोड तुटला आहे हे पाहिले होते. रेल्वे गाडी जर त्या तुटलेल्या रुळावरून गेली तर नक्कीच मोठा अपघात होईल याची कल्पना त्याला आली. ट्रेनला थांबवण्यासाठी लाल कपड्याचा वापर करतात हे त्याला माहीत होते व सुदैवाने त्याने लाल टी शर्ट घातला होता. ट्रेन येत आहे असे दिसल्यावर त्याने लगेच लाल टी शर्ट काढून त्याचा उपयोग लाल सिग्नलप्रमाणे केला व सुमारे 850 लोकांचे जीव वाचवले.

Back to top button