वीर बाला : खेमलता साहू | पुढारी

वीर बाला : खेमलता साहू

धमतरी जिल्ह्यातील सौगा गावात राहणारे फागराम साहू यांची मुलगी खेमलता साहू केवळ अकरा वर्षांची आहे. एकदा खेमलता तिच्या भावाबरोबर गावातील हनुमानाच्या देवळात नेहमीप्रमाणे पूजा करण्यासाठी गेली होती. तो दिवस सुट्टीचा होता. गावातील अनेक मुले देवळाजवळच्या तलावात पोहत होती. खेमलताचा लहान भाऊही पोहायला तलावात उतरला पण त्याला पोहता येत नसल्याने तो बुडू लागला. त्याच्याबरोबरची लहान मुले त्याला बुडताना पाहून तेथून पळून गेली. मंदिरात पूजा करण्यासाठी गेलेल्या खेमलता साहूने तिचा भाऊ बुडतो आहे हे पाहून तलावात उडी टाकली व भावाच्या केसांना धरून तिने त्याला बाहेर काढले. तलावातून सहीसहामत बाहेर काढल्यानंतर इतर लोकांच्या मदतीने तिने त्याला रुग्णालयातही नेले.

खेमलताने दाखवलेल्या साहसाबद्दल छत्तीसगढ राज्य सरकारकडून तिला बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले व केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणार्‍या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी तिची शिफारस करण्यात आली.

संबंधित बातम्या
Back to top button