विज्ञान प्रश्‍नोत्तरे : अणु ऊर्जेच्या क्षेत्रात थोरिअम हे मूलद्रव्य युरेनिअमच्या तुलनेत उत्तम का मानले जाते? | पुढारी

विज्ञान प्रश्‍नोत्तरे : अणु ऊर्जेच्या क्षेत्रात थोरिअम हे मूलद्रव्य युरेनिअमच्या तुलनेत उत्तम का मानले जाते?

अणु ऊर्जेच्या क्षेत्रात थोरिअम हे मूलद्रव्य युरेनिअमच्या तुलनेत उत्तम का मानले जाते?

थोरिअम हे अणु ऊर्जानिर्मिती क्षेत्रात युरेनिअमच्या तुलनेत अनेक बाबतीत उजवे मानले जाते. थोरिअम मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे तसेच ते स्वत: विखंडनशील नसल्याने अनियंत्रित स्थितीत जाऊन स्फोट होण्याचा किंवा शृंखला अभिक्रिया सुरू होण्याचा धोका नसतो. न्यूट्रॉन्सचा प्रवाह बंद केला की शृंखला अभिक्रिया थांबते. युरेनिअमपासून तयार होणारा किरणोत्सर्गी कचरा नष्ट व्हायला दहा हजार वर्षे लागतात तर थोरिअमचा आण्विक कचरा केवळ 500 वर्षांत निरुपद्रवी बनतो. 

महत्त्वाचे म्हणजे युरेनिअमपासून निर्माण होणारे प्लुटोनिअम अण्वस्त्रे बनवण्यासाठी वापरले जाऊ शकते. थोरिअमचा वापर अण्वस्त्रे बनवण्यासाठी केला जाऊ शकत नाही. यामुळे थोरिअम हे स्वच्छ व सुरक्षित अणु ऊर्जेसाठीच भविष्यातील इंधन असणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button