भारतदर्शन : तंबाखूमुक्त गाव | पुढारी | पुढारी

भारतदर्शन : तंबाखूमुक्त गाव | पुढारी

जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या मुहूर्तावर संपूर्णपणे नागालँडमधील ‘गारीफेमा’ हे गाव पूर्णपणे तंबाखूमुक्त झाले आहे. एका अहवालानुसार नागालँडमधील सुमारे 68 टक्के पुरुष व 28 टक्के स्त्रिया तंबाखूच्या व्यसनाने ग्रस्त आहेत. हे चित्र बदलण्यासाठी नागालँड सरकारने पुढाकार घेतला. राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना गाव व्यसनमुक्त करण्यासाठी नियम बनवण्याच्या सूचना दिल्या.  गारीफेमा गावच्या ग्रामपंचायतीने दारू व तंबाखूचे सेवन करणार्‍या व्यक्तीला पाचशे रुपये दंड व विकणार्‍याला एक हजार रुपये दंड ठोठावण्याचा नियम बनवला. ग्रामपंचायतीने केवळ कडक नियमच बनवले नाहीत, तर तंबाखू व दारू व्यसनांविरुद्ध जनजागृतीही केली. या सर्वाचा परिणाम म्हणजे आज गारीफेमा गाव संपूर्णपणे तंबाखूमुक्त आहे. 

Back to top button