प्राणी त्यांच्या जखमांवर इलाज कसे करतात? | पुढारी

प्राणी त्यांच्या जखमांवर इलाज कसे करतात?

मानव जसा त्याच्या जखमांवर इलाज करतो, त्याचप्रमाणे प्राणीही त्यांच्या जखमांवर इलाज करतात. जखम लवकर भरावी म्हणून प्राण्यांचा सर्वात परिणामकारक इलाज आहे जखम चाटणे. प्राणी जेव्हा जखम जीभेने चाटतात, तेव्हा त्यांची लाळ जखमेवर लागते. या लाळेत जंतुनाशक घटक असतात. 

काही प्राणी यापेक्षा वेगळा इलाज करतात. उदा. अनुबिस बबून हा वानर पोटाची समस्या ठीक करण्यासाठी विशिष्ट फळे व पाने खातो. अस्वल जखमेवर माशा बसू नयेत, म्हणून चिखलात लोळते. काही श्‍वानवर्गीय प्राणी गवत खातात. ज्यामुळे त्यांच्या आतड्यांमध्ये काही विकार असतील, तर ते ठीक होतात.

संबंधित बातम्या
Back to top button