गुरूच्या चंद्रावरील ज्वालामुखी | पुढारी | पुढारी

गुरूच्या चंद्रावरील ज्वालामुखी | पुढारी

गुरूचा चंद्र आयो हा अगणित सक्रिय ज्वालामुखींनी व्याप्‍त उपग्रह आहे. आयोवरील किंबहुना आपल्या सौरमालेतील सर्वात सक्रिय व विशाल ज्वालामुखी लोकी पॅटेरा आहे. सुमारे 200 कि.मी. परिघाच्या या ज्वालामुखीचा कधीही उद्रेक होऊ शकतो, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. दर 540 दिवसांनंतर या ज्वालामुखीचा उद्रेक होतो. 1990 सालापासून अंतराळ दुर्बिणींची या ज्वालामुखीवर नजर आहे. गेल्यावेळी 2018 सालच्या मे महिन्यात या ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. अमेरिकेच्या अ‍ॅरिझोना राज्यातील टस्कान येथील ‘प्लॅनेटरी सायन्स इन्स्टिट्यूट’च्या एका वार्तापत्रात ही माहिती देण्यात आली आहे.

Back to top button