इराणची भिंत | पुढारी | पुढारी

इराणची भिंत | पुढारी

इराणच्या पश्‍चिमेकडील सारपोले झहाब प्रांतात संशोधकांना प्राचीन दगडी भिंतीचे अवशेष आढळले आहेत. सुमारे 71 मैल लांबीची ही भिंत बांधण्यासाठी अंदाजे दहा लाख घनमीटर दगडांचा वापर झाल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. उत्तरेकडील बामू पर्वतापासून दक्षिणेकडील झामार्गपर्यंत ही भिंत अस्तित्वात होती. ख्रिस्तपूर्व चौथे शतक ते इसवी सन सहा या कालखंडात कधीतरी या भिंतीचे निर्माण झाले असावे. एका अंदाजानुसार पार्थिअन किंवा सासानिड साम्राज्यातील एखाद्या राजाने ही भिंत साम्राज्याच्या संरक्षणासाठी बांधली असावी. भिंत बांधण्यासाठी स्थानिक बांधकाम सामग्रीचा वापर करण्यात आला आहे. भिंत जेव्हा सुस्थितीत होती तेव्हा दहा फूट उंच होती व तेरा फूट रुंद होती, असा अंदाज आहे. या भिंतीला ‘गवरी भिंत’ असे नाव देण्यात आले आहे. ही माहिती ‘अँटिक्‍विटी’ या नियतकालिकात देण्यात आली आहे.

Back to top button