आजचे राशिभविष्य (१५ मे २०२३) | पुढारी

आजचे राशिभविष्य (१५ मे २०२३)

आजचे राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

मेष : पत्नीसोबत कौटुंबिक अडचणींबाबत चर्चा करा. पती-पत्नी दोघांनीही एकमेकांच्या संगतीत वेळ घालवून प्रेमळ नाते घट्ट करा.
वृषभ
वृषभ

वृषभ : राग अनावर झाल्याने बाचाबाची आणि संघर्ष होऊ शकतो. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत.
राशिभविष्य
मिथुन

मिथुन : मैत्रीचे गाढ जिवलग मैत्रीत रूपांतर झाल्याने त्या जोडीदाराशी प्रणयराधन कराल. अनुभवी लोकांसाठी वेळ काढून त्यांच्या भावना जाणून घ्या.
कर्क
कर्क

कर्क : मित्रांसोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर विचारपूर्वक धन खर्च करा. धन हानी होऊ शकते. अचानक पाहुणे आल्याने घरात गर्दी होईल.
सिंह
सिंह

सिंह : आरोग्य चांगले असेल; पण प्रवास कटकटीचा ठरेल. जे लोक आतापर्यंत विचार न करता पैशाचा खर्च करत होते, त्यांना त्याची गरज भासेल.
कन्या
कन्या

कन्या : महिलांसाठी आयुष्यातील अनेक चढ-उतारानंतर आजअखेर तुमच्यासाठी सुवर्ण दिन असणार आहे, जो तुम्ही साजरा करणार आहात.
तुळ
तुळ

तूळ : धैर्यामुळे तुम्ही प्रेमात जिंकाल. स्पर्धा परीक्षेला बसणार्‍यांनी शांत मनाने सामोरे जावे. परीक्षेच्या भीतीमुळे ग्रासून जाऊ नका.
राशिभविष्य
वृश्चिक

वृश्चिक : अति उत्साह आणि भयकारी महत्त्वाकांक्षा चिंतेत टाकू शकते. हे टाळण्यासाठी भावनांवर नियंत्रण ठेवा. लोकांना नेमके काय हवे हे समजावून घ्या.
धनु
धनु

धनु : गैरसमजात वाईट काळ गेल्यानंतर आजच्या दिवशी संध्याकाळी तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाचा वर्षाव होईल. मन प्रसन्न राहील.
मकर
मकर

मकर : शांत स्वभावाने तुम्ही सर्वकाही ठीक कराल. नातेवाईकांकडून अनपेक्षितपणे गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस ठरेल.
कुंभ
कुंभ

कुंभ : ज्यावर उपाय करता येत नाही, ते शांतपणे सहन करावे. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाहीत. घरच्या आघाडीवर अडचण संभवते.
मीन
मीन

मीन : आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगेल दिसावे, यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल.

Back to top button