आजचे राशिभविष्य (दि. १३ जानेवारी २०२३) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. १३ जानेवारी २०२३)

आजचे राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

मेष : पालकांकडे दुर्लक्ष करणे हे भविष्यातील प्रगतीसाठी मारक ठरेल. मनावर ताबा ठेवा; अन्यथा आर्थिक नुकसान शक्य. ताणतणाव टाळा.
वृषभ
वृषभ

वृषभ : गुंतवणूक करणे टाळा. तुम्ही इतरांच्या चुका विनाकारण दाखविल्यामुळे नातेवाईक तुमच्यावर टीका करतील. बोलताना संयम बाळगा.
राशिभविष्य
मिथुन

मिथुन : संयुक्त प्रकल्प अंतिमत: फायदेशीर ठरतील; पण भागीदाराकडून तुम्हाला प्रखर विरोध सहन करावा लागेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
राशिभविष्य
कर्क

कर्क : संयम बाळगा, आपले निंरतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे हमखास यशप्राप्ती. प्रलंबित असणारी थकबाकी प्राप्त होईल. दिवस आनंदात जाईल.
सिंह
सिंह

सिंह : कौटुंबिक स्नेहमेळाव्याच्या केंद्रस्थानी व्यग्र राहाल. प्रेमाचा आनंद घेता येईल. कलात्मक क्षमतेमुळे कौतुकाची थाप मिळेल, बक्षीसही मिळेल.
राशिभविष्य
कन्या

कन्या : तुमच्या जोडीदाराचे धाडस आणि निष्ठेमुळे तुम्हाला आनंद मिळेल. तुम्ही इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल.
राशिभविष्य
तुळ

तूळ : बोलण्यापूर्वी दोनवेळा विचार करा. संयम बाळगा, तुमच्या बोलण्यामुळे अनवधानाने कुणाच्या तरी भावना दुखावल्या जातील.
राशिभविष्य
वृश्चिक

वृश्चिक : कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी बोलण्याचा तुम्ही बर्‍याच काळापासून प्रयत्न करत असाल, तर आजच्या दिवशी ते शक्य होईल.
राशिभविष्य
धनु

धनु : काही टाळता न येण्याजोग्या घटनांमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल; परंतु तुम्ही भांबावून न जाता आणि त्यावर प्रतिक्रिया न देता शांतपणे परिस्थिती हाताळा.
राशिभविष्य
मकर

मकर : खूप कालावधीनंतर तुम्ही आणि जोडीदार कोणत्याही भांडणाशिवाय शांत दिवस घालवाल, फक्त प्रेम कराल. दिवस आनंदात जाईल.
राशिभविष्य
कुंभ

कुंभ : कामाच्या जागी विरोध होण्याची शक्यता असल्यामुळे चौकस राहा आणि निर्भयपणे वावरा. स्पर्धात्मक स्वभाव तुम्हाला एखाद्या स्पर्धेत यश मिळवून देईल.
मीन
मीन

मीन : योगसाधना तुम्हाला मानसिकदृष्ट्या कणखर बनवेल. दिवस आर्थिकदृष्ट्या चांगला राहील आणि तुम्हाला पर्याप्त धनप्राप्ती होईल.

Back to top button