आजचं राशिभविष्य…(दि.१८ डिसेंबर २०२२) | पुढारी

आजचं राशिभविष्य...(दि.१८ डिसेंबर २०२२)

राशिभविष्य- ज्यो. मंगेश महाडिक

राशिभविष्य
मेष

मेष : आरोग्याबद्दल विशेष काळजी घेणे गरजेचे. तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचे लक्ष जाईल. आर्थिक पारितोषिकही मिळेल.

वृषभ : कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे रागाला आमंत्रण. अचानक प्रणयाराधन मिळाल्याने तुम्ही प्रफुल्लित व्हाल.


मिथुन : तुमच्याकडे खूपच कमी सहनशीलता असेल; परंतु कठोर बोलणे किंवा असंतुलित बोलणे यामुळे आजूबाजूचे लोक अस्वस्थ होतील.

राशिभविष्य
कर्क

कर्क : इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आरोग्य बहरून जाईल. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरूप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल.

सिंह
सिंह

सिंह : थोडेसे अधिक प्रयत्न केलात तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा उत्तम दिवस असेल. स्वास्थ्याकडे दुर्लक्ष केल्याने तणाव वाढण्याची शक्यता.

कन्या
कन्या

कन्या: कुटुंबीयांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा.

राशिभविष्य

तूळ : दिवसाची सुरुवात जरी चांगली असली तरी, सायंकाळच्या वेळी कुठल्याही कारणास्तव तुमचे धन खर्च होऊ शकते, त्यामुळे तुम्ही चिंतीत व्हाल.

राशिभविष्य
वृश्चिक

वृश्चिक : तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाऱ्या लोकांसोबत जाण्यास विरोध करा. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील.

राशिभविष्य
धनु

धनु : चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे. परंतु खर्च होऊ देऊ नका. तुमच्या व्यक्तिमत्त्वामुळे काही नवे मित्र जोडाल. दिवस आनंदात जाईल.

राशिभविष्य

मकर : सामाजिक कामात रमाल; परंतु अन्य लोकांना तुमची गुपिते सांगणे टाळा. काळजी घेणारा आणि समजूतदार मित्र तुम्हाला भेटेल.

राशिभविष्य
कुंभ : अधिक काम आज तुम्हाला मानसिकदृष्ट्या चिंतीत करू शकते. तथापि, संध्याकाळी थोडा वेळ ध्यान करून तुम्ही आपली ऊर्जा परत मिळवू शकता.

 

 

मीन

मीन : काही ठिकाणी माघार घ्यावी लागू शकेल; पण त्यामुळे तुम्ही कोसळून न जाता, अपेक्षित ध्येयासाठी कठोर परिश्रम घ्या.

Back to top button