आजचे राशिभविष्य (दि.१५ ऑगस्ट २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि.१५ ऑगस्ट २०२२)

राशिभविष्य

मेष ः ग्रहमान आनंद मिळवून देणारे आहे. नोकरीतील अडचणी इतरांच्या सहाय्याने सोडवाल. आपल्याला सहकार्य मिळाल्याने कामे सुरळीत होतील .

राशिभविष्य

वृषभ ः अनोळखींवर जबाबदारी सोपवू नका. फसवणूक होण्याची शक्यता. महत्त्वाच्या कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. शत्रूंपासून सावध राहा.

राशिभविष्य

मिथुन ः शिक्षण संस्थेची संबंध येईल. काम मिळेल. नियोजनपूर्वक कामे होणार आहे. कामामध्ये सातत्य राहणार आहे. नातेसंबंध सांभाळले जातील.

राशिभविष्य

कर्क ः यशासाठी संयम फार आवश्यक आहे. कुटुंबातील वादविवाद त्वरित मिटवणे आवश्यक आहे. घरातील आजारी व्यक्तीकडे लक्ष द्यावे लागेल.

राशिभविष्य

सिंह ः नातेवाईकांशी चांगले संबंध राहतील. नव्या योजना कार्यान्वित होण्याची शक्यता. प्रगती होणार आहे. परदेशातून अपेक्षित शुभसंदेश मिळेल.

राशिभविष्य

कन्या ः खासगी बाबींची इतरांशी चर्चा करू नका. घरातील काही प्रसंगांत दक्ष राहा. चांगल्या विचारांचा पाठपुरावा कराल. खर्चामध्ये भर पडू देऊ नका.

राशिभविष्य

तूळ ः नवीन कामास सुरुवात करू नका. नोकरीत तणाव जाणवेल. व्यवसायात यश मिळेल. भावंडांच्या गाठीभेटी होतील. जोडीदाराला समजून घ्यावे लागणार आहे.

राशिभविष्य

वृश्‍चिक ः आरोग्याची काळजी घ्या. दगदगीची कामे टाळा. प्रवास शक्यतो टाळा. नोकरीत चांगली स्थिती राहील. मुलांना यश मिळेल. धार्मिक कार्यात वेळ द्याल.

राशिभविष्य

धनु ः व्यापार-व्यवसायात सकारात्मक बदल होतील. आर्थिक लाभ होईल. नोकरीत अडचण येण्याची शक्यता आहे; पण सहकार्यामुळे काम सहज साध्य होईल.

राशिभविष्य

मकर ः हाती घेतलेली कामे पूर्ण करा. कर्तुत्व दाखवून द्याल. कार्यक्षेत्रात वादाचे प्रसंग येतील. गोड बोलून हाताखालील व्यक्तींकडून काम करून घ्या.

कुंभ -

कुंभ ः आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. वस्तू सांभाळून ठेवा.

राशिभविष्य

मीन ः कार्यक्षेत्रामध्ये प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. यशाचे मार्ग सुलभ होतील. नोकरदारांना दिलासा मिळेल. हाती घेतलेल्या कामांत यश मिळेल.

Back to top button