आजचे राशिभविष्य (दिनांक २५ जुलै २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दिनांक २५ जुलै २०२२)

राशिभविष्य
मेष
मेष- दिवसाची सुरुवात त्रासदायक होईल. उत्तरार्ध लाभदायक जाईल. कलाकार व लेखकांना आर्थिक लाभ होतील. आत्मविश्‍वास वाढेल.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ- महत्त्वाची कामे पूर्वार्धात करावीत. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. मनाविरुद्ध घटना घडतील. व्यावहारिक अडचणी येतील.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन- संमिश्र असा दिवस. मनासारख्या गोष्टी घडतील. प्रसन्‍नता लाभेल. मनपसंद खरेदीचा आनंद घ्याल. आत्मबल वाढेल.
राशिभविष्य
कर्क
कर्क- सूर्योदयाला कामे सुरु करा. संयमाने घ्यावे लागेल. अनावश्यक खर्च होईल. लोकांना शब्द देऊ नका. गैरसमजातून वादविवाद होतील.
राशिभविष्य
सिंह
सिंह-उत्साही राहाल. आप्तेष्टांच्या मदतीला धावून जाल. व्यावसायिक प्रगती होईल. विवाहविषयक आनंदाची बातमी ऐकायला मिळेल.
राशिभविष्य
कन्या
कन्या- नियमांचे पालन आवश्यक आहे. प्रेरणादायी कार्य कराल. वरिष्ठांचे आशीर्वाद लाभतील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. कार्यसिद्धी होईल.
राशिभविष्य
तुळ
तुळ- जुनेआजार तोंड वर काढतील. परावलंबी स्वभावामुळे कामे रखडतील. नियोजन आवश्यक आहे. नियमांचे पालन करा. नियमितपणे व्यायाम महत्त्वाचा आहे.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्‍चिक- दिवसाची सुरुवात चांगल्या बातमीने होईल. वादविवादापासून दूर राहा. अस्वस्थता राहील. कृतकर्माचा पश्‍चाताप होईल.
राशिभविष्य
धनु
धनु- प्रलंबित कामांना गती मिळेल. कोर्ट-कचेरीच्या कामात यश. जोडीदाराची साथ लाभेल. पर्यटनाचा आनंद घ्याल. व्यावसायिक प्रगती होईल.
राशिभविष्य
मकर
मकर- संयम आवश्यक. आप्तस्वकीय सहकार्य करतील. जबाबदारीने कामे कराल. आर्थिक प्रश्‍न सुटतील. पदोन्‍नतीचे योग संभवतात.
कुंभ -
कुंभ
कुंभ- प्रेम प्रकरणात अडचणी येतील. गुंतवणुकीस अयोग्य दिवस. मागील गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता. संतुलन साधणे महत्त्वाचे आहे.
राशिभविष्य
मीन
मीन- पूर्वार्ध लाभदायक. वाहन सावकाश चालवा. कौटुंबिक कलह टाळावा. दुसर्‍यांचे म्हणणे ऐकूण घेणे आवश्यक आहे. मनःस्ताप होईल.

Back to top button