आजचे राशी भविष्य (रविवार दि. १ ऑगस्ट) | पुढारी

आजचे राशी भविष्य (रविवार दि. १ ऑगस्ट)

मेष : स्वप्नपूर्तीचा दिवस. अनपेक्षितपणे लाभ होतील. आत्मविश्‍वास वाढेल. लोकसेवा कराल. प्रसन्‍नता होईल.
वृषभ : कर्जदार तगादा लावतील. ध्येयाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा.
मिथुन : व्यावसायिकांना धनलाभाचे योग संभवतात. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील.आतिथ्यामध्ये दिवस जाईल. विवाहविषयक आनंददायी वार्ता कानावर येईल.
कर्क : मनासारख्या घटना घडतील. प्रेरणादायी कार्य कराल. प्रतिष्ठा मिळवून देणारी घटना घडेल.
सिंह : गैरसमजातून वादविवाद होतील. संवादाने प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न करा. अस्वस्थता राहील.
कन्या : प्रतिक्रिया देताना सावधानता बाळगा. मध्यस्थी करू नका. आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस.
तूळ : आज मंगलकार्यामध्ये सहभाग घ्याल. भागीदारीमध्ये लाभ होईल. कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यश मिळेल.
वृश्‍चिक : जवळचे लोक सहकार्य करतील. नोकरी करणार्‍यांना लाभदायक. पदोन्‍नतीचे योग संभवतात.
धनु : सट्टा, शेअर्समध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रेम प्रकरणांमध्ये अपयश येण्याची शक्यता आहे.
मकर :कौटुंबिक कलह टाळा. अनावश्यक खर्च होतील. वाहने सावकाश चालवा. वास्तुसंबंधित कामे रखडतील.
कुंभ : साहस यशाकडे घेऊन जाईल. प्रलंबित कामांना गती मिळेल. आप्तस्वकीयांचे सहकार्य लाभेल.
मीन : क्रोधावर नियंत्रण आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल दिवस. सहनशीलता व संयम आवश्यक आहे.

 

Back to top button