कांदा भजी कुरकुरीत होण्यासाठी काय करावे? | पुढारी

कांदा भजी कुरकुरीत होण्यासाठी काय करावे?

पुढारी ऑनलाईन डेस्क : कांदा भजी कुरकुरीत होण्यासाठी काय करावे? यासाठी वाचा या खास टिप्स. पावसात गरमागरम भजीची चव चाखायला तुम्हाला नक्कीचं आवडत असेल. त्यात जर कांदा भजी आणि गरम चहा असेल तर क्या बात है!

अधिक वाचा –

तर आज आपण इथे कांदा भजी कशी करायची आणि ती कुरकुरीत होण्यासाठी काय करावे, याची कृती पाहणार आहोत.

लागणारे साहित्य – मोठे कांदे, मीठ, बेसन पीठ, ओवा, हळद, धने पुड किंवा मोठे धने, खाण्याचा सोडा.

अधिक वाचा- 

कृती –

मोठे कांदे घ्यायचे. उभे चिरायचे. पातळ काप होतील, अशा पध्दतीने कांदा कापायचा. त्याच्या पाकळ्या नीट वेगवेगळ्या करुन घ्याव्यात. त्यामध्ये चवीसाठी मीठ आणि लिंबू पिळावा. हे मिश्रण फक्त १० मिनिटे ठेवायचं. दहा मिनिटांपेक्षा अधिक वेळ हे मिश्रण ठेवू नये. कारण, अधिक वेळ ठेवल्यास कांदा खूप जास्त मऊ पडेल.

१० मिनिटांमध्ये कांद्याला भरपूर पाणी सुटेल. त्यामध्ये धने पुड घालावी किंवा मोठे मोठे धने हाताने दोन भाग करून तसेच घातले तरी चालेल.

या सर्व मिश्रणात बसेल तेवढे बेसन पीठ घालावे. त्यामध्ये थोडी हळद, ओवा घालावा. हे पदार्थ चांगल्या प्रकारे मिसळून १० मिनिटे बाजूला ठेवावं.

पाणी अजिबात घालू नये. कांद्याला जे पाणी सुटलं होतं, त्यातंचं बेसनपीठ घालून मिश्रण घट्ट करून घ्यावं. हे पीठ घट्ट असावं.

तळण्यासाठी तेल गरम करण्यास ठेवावं. भजीचे पीठ तेलात सोडण्याआधी त्यात थोडा खाण्याचा सोडा घालावा. तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये आपण नेहमी घट्ट किंवा पीठ गोळा करून भजी सोडतो, तसे तेलात सोडू नये.

अधिक वाचा – 

त्याऐवजी, अगदी छोटे छोटे सोडावे. किंवा पीठातील पाकळ्या सुटे सुटे करून तेलात सोड्याव्यात. खूप छान कुरकुरीत भजी होतील.

या टिप्सदेखील वाचा- 

तिखट आणि पाण्याचा अजिबात वापरू नये. पाण्यामुळे भजी नंतर मऊ पडतात.

मीठ आणि लिंबूमुळे भजीला गोडसर चव येते आणि कांद्याचा तिखटपणाही येतो.

भजी तिखट हवी असल्यास हिरव्या मिरच्या बारीक करून भजी तेलात सोडण्याआधी पीठात घातल्या तरी चालतील.

जर तुम्ही अंडे खात असाल तर कांदा भजी कुरकुरीत होण्यासाठी पीठात अंडे फेटून घालावे.

कोकण भागात अशा पध्दतीने भजी केल्या जातात. अंड्यामुळेदेखील भजी क्रिस्पी होतात.

अधिक वाचा – 

 

Back to top button