

पुढारी ऑनलाईन डेस्क : maharashtra rain : पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराची भीती निर्माण झाली आहे.
maharashtra rain पुणे-बंगलोर महामार्गावरील तावडे हॉटेल ते सांगली फाटा मार्गावरील सर्व शोरूम गॅरेज मंगल कार्यालये हॉटेल्स धाबे पाण्याखाली गेले आहेत. महामार्गावरील दोन्ही बाजूचे सर्विस रोड बंद करण्यात आले आहेत सर्व्हिस रोडवर सर्व्हिस रोडवर किमान चार ते साडेचार फूट पाणी आले आहे.
सांगली फाट्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आपत्ती व्यवस्थापनाचे टीम सज्ज आहे पोलीस अधीक्षक शैलेश बळकवडे अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे पोलीस उप अधीक्षक मंगेश चव्हाण पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण भोसले यांच्यासह 100 पोलीस महामार्गावर बंदोबस्तासाठी कार्यरत आहेत.
फेसबुकच्या माध्यमातून सर्व्हिस रोडवर आणखी दोन ते अडीच फूट पाणी वाढल्यास पुणे बेंगलोर महामार्ग बंद होण्याची शक्यताही नाकारता येत नाही
पुणे बेंगलोर महामार्गावर सकाळपासून मुसळधार पाऊस आहे दुपारी बारा नंतर पावसाचा वेग दुपर तिपटीने वाढल्याने रस्त्यावर काहीच दिसत नाही अशा धोकादायक स्थितीत वाहनचालकांना सर्कस करावी लागत आहे
कोयना धरणातून आज (ता.२३) सकाळी १० वाजता कोयना धरणाचे दरवाजे पाच फुटापर्यंत उचलण्यात आल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात हे दरवाजे पाच फुटावरून आठ फुटापर्यंत नेण्यात आले. त्यामुळे धरणातून प्रतिसेकंद ३५ हजार १७१ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे सांगलीवरही महापूराची टांगती तलवार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्रीपासून गुरुवारी दिवसभर अनेक ठिकाणी ढगफुटी झाल्याने २४ तासांत २०२ मिलिमीटर पाऊस कोसळला. राजाराम बंधार्यावरील पाणी पातळी आज (ता.२३) ४९ फुट १० इंचावर गेली आहे. जिल्ह्यातील ११६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदी इशारा पातळी ३९ फूट व धोका पातळी ४३ फूट आहे.
महापुराच्या भीतीने जिल्ह्यातील शाहूवाडी, करवीर, पन्हाळा तालुक्यांतील हजारभर कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. दूधगंगा, वारणा, हिरण्यकेशी, घटप्रभा, वेदगंगा या नद्या सायंकाळी 6 पर्यंत इशारा पातळीपर्यंत पोहोचल्या होत्या. दरम्यान, रात्री उशिरा बावडा-शिये रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.
कोल्हापूरसाठी वेधशाळेने आज २३ रोजी 'ऑरेंज अॅलर्ट' जारी केला आहे. गुरुवारी दुपारी पुण्याहून 'एनडीआरएफ'च्या दोन तुकड्या कोल्हापुरात दाखल झाल्या. यातील एक तुकडी शिरोळला, तर दुसरी तुकडी करवीर तालुक्यात रवाना करण्यात आली आहे. पाऊस असाच कोसळत राहिल्यास शुक्रवारी कोल्हापूरला महापुराची भीती आहे.
गली; पुढारी वृत्तसेवा : maharashtra rain : कोयनेतून आज (ता.२३) दुपारपर्यंत ५० हजार क्युसेस विसर्ग सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कृष्णा नदीतील पाणी पातळी सध्याच्या पाणीपातळी पेक्षा दहा ते बारा फुटाने अधिक वाढू शकते.
नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक तेथे तत्काळ स्थलांतरण सुरू करावे, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी दिला. सांगलीमध्ये (sangli rain update)आयर्विन पूल येथे पाणीपातळी ५० ते ५२ फुटापर्यंत वर जाऊ शकते.
सखल भागातील नागरिकांनी तसेच नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावे. नदीपात्रात कोणीही जाऊ नये, यासाठी प्रशासनाने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.
सांगली जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडला. कोयना, चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी सुरू आहे. दिवसभरात तब्बल दहा फूट पाणीपातळी वाढल्याने कृष्णा, वारणा नद्यांना पूर आला आहे.
सायंकाळपर्यंत पाणी सांगली शहरासह नदीकाठच्या अनेक गावांत घुसण्याचा धोका आहे.
जिल्ह्यात व पाणलोट क्षेत्रात गेले दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील पाण्याची पातळी वाढते आहे.
गेल्या २४ तासात सरासरी ५९.६ मिमी पावसाची नोंद झाली. शिराळा तालुक्यात १५४.३मिमी पाऊस पडला.