

राशिवडे; पुढारी वृतसेवा : राधानगरी पाऊस संततधार सुरू आहे. राधानगरीत पाऊस आणि वाऱ्यामुळे म्हासुर्ली-कोनोलीत भूस्खलनामुळे घर गाडले. यामध्ये दोघे गाडले गेल्याची शक्यता आहे. राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली-कोनोली येथे भूस्खलन होऊन एक घर गाडले गेले आहे.
अधिक वाचा –
राधानगरी येथे पाऊस, वादळी वाऱ्यामुळे भूस्खलन झाले. यात दोन व्यक्तीसह जनावरे गाडली घेल्याची भीती व्यक्त होत आहे. याठिकाणी रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले आहे. अशी माहिती तहसीलदार मीना निंबाळकर यांनी दिली. संततधार पाऊस आणि वाऱ्यामुळे वीज, नेटवर्क पूर्णपणे बंद आहे.
तर जागोजागी रस्त्यावर पाणी आल्याने दळणवळण बंद झाले आहे. कोनोली गावामध्ये रात्री उशीरा अचानक मुसळधार ढगफुटीसदृष्य पाऊस झाला. त्यामुळे डोंगराचा काही भाग घसरला.
यामध्ये एक घर गाडले गेले. या घरात पती, पत्नीसह दोन जनावरे गाडल्याची भीती आहे. मंडल निरीक्षक देवीदास तारडे यांच्यासह महसूल विभागाची टीम याठिकाणी सकाळी पोहोचली आहे.
अधिक वाचा-
ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने दळणवळास व्यत्यय येत आहे. तर मोबाईल, दुरध्वनी सेवा, वीज खंडित आहे. रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले आहे. संततधार पडणाऱ्या उच्चांकी पावसामुळे या परिसरातील रस्ते पूर्णपणे बंद आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील 8 प्रमुख व 28 जिल्हा मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद झाली आहे.
याचबरोबर १११ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. संततधार पावसामुळे कोल्हापूरला महापुराचा धोका निर्माण झाला आहे.
राजाराम बंधार्यावरील पाणी पातळी सकाळी ७ वाजता ४६.०७ फुटांवर गेल्याने पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
अधिक वाचा-
दरम्यान खेड्यातील गावांमधील ओढ्या नाल्याना पाणी आल्याने वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्रीपासून गुरुवारी दिवसभर अनेक ठिकाणी ढगफुटी झाल्याने 24 तासांत 202 मिलिमीटर पाऊस कोसळला.
महापुराच्या भीतीने जिल्ह्यातील शाहूवाडी, करवीर, पन्हाळा तालुक्यांतील 996 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले.
अधिक वाचा-
दूधगंगा, वारणा, हिरण्यकेशी, घटप्रभा, वेदगंगा या नद्या सायंकाळी 6 पर्यंत इशारा पातळीपर्यंत पोहोचल्या होत्या. दरम्यान, रात्री उशिरा बावडा-शिये रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.
गुरुवारी दुपारी पुण्याहून 'एनडीआरएफ'च्या दोन तुकड्या कोल्हापुरात दाखल झाल्या. यातील एक तुकडी शिरोळला, तर दुसरी तुकडी करवीर तालुक्यात रवाना करण्यात आली आहे.
पाऊस असाच कोसळत राहिल्यास शुक्रवारी कोल्हापूरला महापुराची भीती आहे. पंचगंगा नदीचे पाणी जामदार क्लबजवळ आले.
कुंभार गल्ली, मंगळवार पेठेतील रेणुका मंदिर, न्यू पॅलेस, रामानंदनगर, अॅस्टर आधार हॉस्पिटल परिसरात पाणी आल्यामुळे कोल्हापूर शहरातील जनजीवन विस्कळीत झाले.
दरम्यान, राधानगरी धरणातून 1,425 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
कसबा बावडा-शिये रस्ता बंद
मलकापूर ते रत्नागिरी मार्गावर येल्लूरजवळ पाणी
बर्कीजवळ पुलावर पाणी; संपर्क तुटला
मालेवाडी-सोंडोली येथील पूल वाहतुकीस बंद
उखळू, खेडे, सोंडोलीकडे जाणार्या रस्त्यावर पाणी
कडवी पुलावर पाणी; मलकापूर ते शिरगाव मार्ग बंद
करंजफेण, माळापुढे, पेंढाखळे वाहतूक थांबवली
करुंगळे ते निळे व कडवे ते निळे मार्ग बंद
निलजी, ऐनापूर बंधार्यावर पाणी; वाहतूक बंद
मालेवाडी ते सोंडोली रस्त्यावर पाणी
गगनबावडा मार्गावर किरवे येथे पाणी; वाहतूक बंद
कसबा बीड-महेदरम्यानचा पूल पाण्याखाली
गारगोटी-गडहिंग्लज रस्ता वाहतुकीसाठी बंद
मुरगूड ते कुरणी हा बंधरा पाण्याखाली,
निढोरीमार्गे कागल या रस्त्यावरून वाहतूक सुरू
सुरुपली ते मळगे बंधारा पाण्याखाली
सोनगे ते बानगे मार्गावरून वाहतूक सुरू
बस्तवडे ते आणूर बंधार्यावर पाणी
पर्यायी सोनगे, बानगेमार्गे वाहतूक सुरू
कोवाडे, नांगनूर, निलजी, ऐनापूर या बंधार्यांवर पाणी
महे ते बीड मार्गावर पाणी; वाहतूक बंद
अधिक वाचा-