पोलिसास मारहाण; दोन नगरसेवकांना अटक | पुढारी

पोलिसास मारहाण; दोन नगरसेवकांना अटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

तिहेरी अपघातानंतर पोलिसास मारहाण करुन त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी शिवसेना व भाजपा नगरसेवकांना अटक केली आहे. 

शिवसेनेचे भागवत आरोटे आणि भाजपचे राकेश दोंदे अशी अटक केलेल्या नगरसेवकांची नावे आहेत. अंबड पोnfस ठाण्याच्या हद्दीतील एक्सलो पॉइंट येथे तिहेरी अपघात झाला होता. त्यातील एक वाहन नगरसेवक आरोटे यांच्या भावाचे होते.

 नगरसेवक आरोटे यांचे बंधू राहुल आरोटे याने अपघाताची माहिती दिल्यानंतर आरोटे व दोंदे घटनास्थळी गेले. त्यावेळी गस्तीवर असलेले पोलिस हवालदार विष्णू गावित घटनास्थळी गेले. संशयितांनी गावित यांना मारहाण केली. याप्रकरणी गावित यांनी अंबड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघा नगरसेवकांसह इतर दोघांना अटक केली आहे.

Back to top button