

पुढारी ऑनलाईन डेस्क : रात्री झोपताना दूध पिण्याची अनेकांना सवय असते. मात्र, त्याच दुधात हळद ( हळद दूध ) घालून पिली तर त्याचे दीर्घकालीन फायदे आहेत. हळद दूध पिल्याने फिटनेस राहतो शिवाय चांगली झोपही येते.
असा कुणीही व्यक्ती नसेल की, त्यांना फिटनेस नको असेल. त्यासाठीच जीममध्ये आपण घाम गाळतो आणि त्यामुळे रात्री आपल्याला गाढ झोप लागते.
आपल्याला व्यायामाबरोबर आहाराकडेही लक्ष द्यावे लागते त्यामुळे आपला फिटनेस तर राहतोच शिवाय आपल्याला गाढ झोपही लागते.
आज जे ड्रींक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ते जर नियमित घेतले तर आपल्याला कुठल्याही तक्रारींचा सामना करावा लागणार नाही.
दिवसभर काम करून थकलेल्यांना हे पेय खूप उपयुक्त आहे. तसेच जे फिल्ड जॉब करतात किंवा जिममध्ये खूपच घाम गाळतात त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी हळद दूध पिले पाहिजे.
मात्र, थंडीच्या दिवसांत हे पेय पिवू नये. उन्हाळ्यात हे सर्वात जास्त फायदेशीर असते.
हळद दूध प्यायल्याने इम्युनिटी वाढते ते औषधाचे काम करते, किंबहुना त्यापेक्षा जास्त काम करते.
रात्री झोपण्याआधी एक कप दूध पिल्याने व्हायरल इन्फेक्शन आणि तापापासून बचाव होतो.
हळदीमुळे घशात ओलसरपणा येतो. त्यामुळे श्वासनलिकेत निर्माण झालेला कफ शरीरातून बाहेर पडण्यास मदत होते.
त्यामुळे कोरड्या खोकल्यापासून आराम मिळतो.
जर तुम्हाला ऋतु बदलला की सर्दी पडसे होत असेल तर हळद दूध खूपच फायदेशीर ठरते.
अँटी व्हायरल आणि अँटी बॅक्टेरियल तत्वे असल्यामुळे हे दूध खूपच फायदेशीर ठरते. त्यामुळे इन्फेक्शनविरुद्ध लढण्यास मदत होते.
गरम दुधात एक चमचा हळद टाकून पिल्यास वजन कमी होण्यास मदत होते.
हे दूध पिल्याने आतडी आणि पाचक संस्था मजबूत होते. त्यामुळे वेगाने वजन कमी होण्यास मदत होते.
जर तुम्ही अशा लोकांमधील आहात की तुम्हाला वारंवार कुस बदलावी लागते आणि अर्धवट झोप लागते तर झोपण्याआधी तुम्ही हळद दूध प्या.
हळदीत अमीनो ॲसिड असते आणि दूधासोबत ते घेतल्याने चांगली झोप लागते. झोपण्यआधी अर्धात तास आधी हळदीचे दूध पिले पाहिजे.
हेही वाचा :