दाऊद, आंदेकर टोळ्यांच्या नावाने खंडणी मागणार्‍या दोघांवर गुन्हा | पुढारी

दाऊद, आंदेकर टोळ्यांच्या नावाने खंडणी मागणार्‍या दोघांवर गुन्हा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : व्यवसायासाठी दिलेल्या 30 लाखांवर 40 लाख रूपये व्याज घेऊनही दाऊद आणि आंदेकर टोळीशी संबंधीत असल्याचे सांगून आणखी 30 लाखांची खंडणी मागणाऱ्या शशिकांत महादेव गोलांडे (76, रा. सदाशिव पेठ, शनिवार जवळ) आणि निलेश सुरेश देशपांडे (47, रा. साकेत अपार्टमेंट, कर्वेनगर, पुणे) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अनिरूध्द प्रदिप पटवर्धन (35, रा. पटवर्धन वाडा, सदाशिवपेठ) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 2015 ते मार्च 2021 दरम्यान घडला.फिर्यादी शशिकांत पटवर्धन यांनी आरोपी शशिकांत गोलांडे याच्याकडून 30 लाख रूपये व्याजाने घेतले होते. त्या बदल्यात मुद्दल 30 लाख व व्याज 40 लाख असे एकूण 70 लाख रूपये घेतले. असे असताना देखील आरोपी पुन्हा फिर्यादी यांना 30 लाखांची मागणी करत होते. तसेच वेळोवेळी फोन करून धमकी देऊन फिर्यादी घरी नसताना दोघेही आरोपी त्यांच्या घरी गेले. तेथे फिर्यादीची आई आणि वडील यांना दाऊत आणि आंदेकर टोळीशी संबंध असल्याचे सांगून जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत गोसावी करत आहेत.

 

Back to top button