जळगाव : फूस लावून अल्पवयीन मुलीस पळविले | पुढारी

जळगाव : फूस लावून अल्पवयीन मुलीस पळविले

जळगाव; पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील आव्हाणे शिवारातून अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचे घटना समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वाचा : जळगाव जिल्ह्यातील ५१ गुन्हेगार हद्दपार; पोलिस अधिक्षकांचा दणका 

याप्रकरणी पाेलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार,  तालुक्यातील आव्हाणे शिवारात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या आईवडीलांसोबत राहते. शेजार्‍यांचे कपडे देवून येते, असे सांगून शनिवारी (दि. ५) अल्पवयीन मुलगी दुपारी घराबाहेर पडली. ती रात्री उशीरापर्यंत आली घरी परतली नाही. आईवडीलांना शेजारी जावून पाहणी केली असता मुलगी घरी आली नसल्याचे सांगितले. मुलीच्या मित्र व मैत्रिणींकडे तपास केला परंतु, मुलगी मिळाली नाही. 

वाचा : शेवग्याची भाजी खाण्याचे फायदे; हिरवीगार भाजी खाऊन पावसाचे असे करा स्वागत 

 रविवार (दि. ६ जून रोजी) रात्री उशीरा तालुका पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली. मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ विलास पाटील करीत आहेत.

Back to top button