जळगाव : नोकरीचे अमिष दाखवून तरूणीकडून १ लाख ३८ हजारांची ऑनलाईन फसवणूक | पुढारी

जळगाव : नोकरीचे अमिष दाखवून तरूणीकडून १ लाख ३८ हजारांची ऑनलाईन फसवणूक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा ; जळगावमधील तरूणीला नोकरीचे आमिष दाखवून सुमारे १ लाख ३८ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा : ‘जेव्हा ठाकरे-मोदी भेटतात, तेव्हा चर्चा तर होणारच’

जळगाव शहरातील २३ वर्षीय तरुणीची फसवणूक झाली आहे. ३ जून रोजी या तरुणीने नोकरी डॉट कॉम या साईटवर नोकरी मिळावी यासाठी नोंदणी केली. यानंतर काही वेळातच या तरुणीस अनोळखी नंबरवरुन फोन येऊन नोकरीबाबत माहिती देण्यास सुरूवात झाली. 

अधिक वाचा : लस घ्या आणि एफडीवर अधिक व्याज मिळवा, या बँकांनी मर्यादित कालावधीची दिली ऑफर

प्रोसेसिंग फी व विविध सुविधांसाठी पैसे भरावे लागतील असे सांगत भामट्यांनी तरुणीकडून सकाळी ११ ते रात्री ८ वाजेच्या दरम्यान दरवेळी वेगवेगळे कारण सांगून सुमारे १ लाख ३८ हजार ७८० रुपये ऑनलाईन पद्धतीने मागवुन घेतले. यानंतर त्या मुलीशी संपर्क केला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याचे तरूणीच्या लक्षात आले. तरूणीच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्सटेबल संजय सपकाळे करत आहे.

 

Back to top button