Maharashtrian Alu Vadi : खमंग अळूची वडी कशी बनवायची? अळूची पाने कोणती चांगली कसे ओळखायचे? | पुढारी

Maharashtrian Alu Vadi : खमंग अळूची वडी कशी बनवायची? अळूची पाने कोणती चांगली कसे ओळखायचे?

अळू वडीची रेसिपी करायला सोपी आणि खायला चविष्ट अशी आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ म्हणून अळू वडी केली जाते. अळूच्या पानांपासून वड्या तयार केल्या जातात. (Maharashtrian Alu Vadi) हा पदार्थ करताना वापरण्यात येणारे घटक, मसाले आरोग्यदायी असतात. गौरी-गणपतीच्या सणाला गौरी आवाहनावेळी अळूची वडी नैवेद्यासाठी आवर्जून केली जाते. अळूची पाने पौष्टिक असतात. ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी अळूच्या पानांपासून बनवलेले पदार्थ खावेत. (Maharashtrian Alu Vadi)

अळूची वडी
अळूची वडी

अळूची पाने चांगले आहेत की नाही, कसे ओळखावे?

अळूची पाने दोन प्रकारची असतात. एक लाल देठाची आणि दुसरी पांढऱ्या देठाची. पांढऱ्या देठाची पाने खाण्यायोग्य नसतात. लाल देठाची पाने खाण्यायोग्य असतात. पांढऱ्या देठाची पाने खाल्ल्याने घशामध्ये आग होते. त्यामुळे पाने बघून घेताना लाल देठाची घ्यावी.

No Image

Recipe By स्वालिया शिकलगार

Course: नैवेद्य Cusine: महाराष्ट्रीयन Difficulty: : सोपे

Servings

१० minutes

Preparing Time

२० minutes

Cooking Time

२० minutes

Calories

kcal

INGREDIENTS

  1. अळूची पाने

  2. बेसन पीठ

  3. जिरे

  4. मोहरी

  5. ओवा

  6. कोथिंबीर

  7. हळद

  8. मीठ

  9. पाणी

  10. तेल

  11. लाल तिखट

  12. गरम मसाला किंवा धने पावडर

  13. लसुण पेस्ट

  14. आमसुल किंवा चिंचेचे पाणी

DIRECTION

  1. अळूची पाने धुऊन घ्या. पानांच्या जाडसर शिरा काढून टाका

  2. अळूच्या पानाचे देठ मोडून टाका

  3. एका भांड्यात बेसन पीठ, मीठ, हळद, लाल तिखट, गरम मसाला, ओवा, जिरे लसुण पेस्ट मिक्स करून घ्या

  4. पाणी हळूहळू घालत पीठ तयार करून घ्या

  5. पीठ पातळ किंवा खूप घट्ट होऊ नये, याची काळजी घ्या

  6. हे पीठ अळूच्या पानांना लावता येईल, इतके पाणी पिठात टाकून घ्या

  7. आता अळुची पाने घेऊन उलट्या बाजून आम्सूल किंवा चिंचेचे पाणी लावून घ्या

  8. त्यावर प्रमाणानुसार पीठ लावा

  9. आता पाने दुमडून गोलाकार रोल करून घ्या

  10. असे रोल तयार करून बाजूला ठेवून द्या

  11. आता एका स्टीलच्या चाळणीला आतून तेल लावून घेऊन हे रोल ठेवून द्या

  12. गॅसवर भांडे घेऊन त्यात निम्म्याहून अधिक पाणी घेऊन तापवून घ्या

  13. त्यावर ही चाळण ठेवून झाकण ठेवा

  14. १५ मिनिटे वाफ येऊ द्या

  15. नंतर झाकण काढून चाकूने पीठाचे रोल शिजले की नाही हे पाहता येईल

  16. रोल थंड झाले की, त्याच्या वड्या कापून घ्या

  17. फक्त वाफलेल्या वड्यादेखील खायला छान लागतात

  18. तळलेल्या वड्या नको असतील तर एका कढईमध्ये थोडे तेल घेऊन त्यात मोहरीची फोडणी टाका

  19. ही फोडणी काप केलेल्या वड्यांवर टाका

  20. किंवा तेल गरम करून घेऊन वाफवलेल्या वड्या लालसर तळून घ्या

NOTES

    Back to top button