Bhavana Gawali : खासदार भावना गवळींच्या अडचणीत वाढ, निकटवर्तीयाला ईडीकडून अटक

Bhavana Gawali : खासदार भावना गवळींच्या अडचणीत वाढ, निकटवर्तीयाला ईडीकडून अटक
Published on
Updated on

वाशिम; अजय ढवळे : वाशिम- यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्येच बदल करुन त्याचे कंपनीमध्ये रुपांतर करण्यात आल्याप्रकरणी या कंपनीचे संचालक सईद खान यांची काही

दिवसांपूर्वी चौकशी झाली होती. तर आता त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.

सोमवारी रात्री आठच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र ही अटक बेकायदेशीर आहे, असा दावा त्यांचे वकील इंद्रापल सिंह यांनी केला आहे.

खान हे ईडीकडून देण्यात आलेल्या सर्व सुचनांचे पालन करण्याबरोबरच तपासात सहकार्य करत असतानाही त्यांना अटक करण्यात आल्याबद्दल सिंह यांनी नाराजी व्यक्त केलीय. या अटकेमुळे भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.

ज्या कंपनीच्या चौकशीसाठी खान यांना अटक करण्यात आलीय त्याच कंपनीमध्ये गवळी या डायरेक्टर होत्या. त्यामुळे आगामी काळामध्ये गवळी यांची या प्रकरणामध्ये चौकशी केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मागील काही दिवसांमध्ये गवळी यांच्यासंदर्भातील हे दुसरे प्रकरण आहे ज्यामध्ये ईडीने कारवाई केलीय.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मागील महिन्यात भावना गवळी यांच्यावर १०० कोटींच्या घोटाळ्याच्या आरोप केला होता. त्यानंतर गवळी यांच्या दोन निकटवर्तीय सहकाऱ्यांना ईडीसमोर हजर राहण्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. महिला उत्कर्ष प्रतिष्ठानशी संबंधित दोन व्यक्तींना ईडीने समन्स पाठवले होते. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी हे समन्स पाठवण्यात आले होते.

दोघांनाही ईडीच्या तपास अधिकाऱ्यांसमोर हजर रहावे असे या समन्समध्ये म्हटले होते. मात्र या दोन्ही व्यक्तींनी खासगी कारण देत आपल्याला ईडीसमोर हजर राहण्यासाठी १५ दिवसांचा अवधी घ्यावा अशी मागणी ६ सप्टेंबर रोजी केली होती.

शिवसैनिक आडकाठी आणत असल्याची तक्रार

वाशिम जिल्ह्यातील महामार्गाच्या कामांमध्ये शिवसैनिक आडकाठी आणत असल्याची तक्रार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानंतर गवळी यांनी १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.

गवळींनी ५५ कोटींचा बालाजी पार्टीकल बोर्ड हा कारखाना २५ लाख रुपयांत घेतला आहे. सन २०१९ मध्ये रिसोड येथील जनशिक्षण संस्था व महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या कार्यालयातून ७ कोटी रुपये चोरून नेल्याची तक्रार गवळी यांनी केली होती.

७ जुलै २०१९ रोजीच्या चोरीची तक्रार १२ मे २०२० रोजी करण्यात आली. १० महिने उशिरा तक्रार देण्याचे कारण काय?, त्या कार्यालयात ७ कोटी कुठून आले? असे सवाल सोमय्या यांनी केले होते.

या संदर्भात केंद्रीय सहकार मंत्री, सीबीआय, ईडी, स्टेट बँक, नॅशनल को- ऑप. डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन व अन्य ठिकाणी तक्रारी केल्या आहेत. मुंबई येथील ईडीची पथके रिसोड येथे ३० ऑगस्ट रोजी सकाळी दाखल झाली.

भावना गवळींच्या रिसोड अर्बन सहकारी पतसंस्था, आयुर्वेद महाविद्यालय, भावना पब्लिक स्कूल, डी. फॉर्म महाविद्यालय, पुंडलिकराव गवळी महाविद्यालय, शिरपूर जैन या संस्थांमध्ये धाडी टाकण्यात आल्या होत्या.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : काेल्‍हापूर : सोमय्यांकडून मुश्रीफांविरोधात मुरगुड पोलिस ठाण्यात तक्रार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news