बेळगाव : जिल्ह्यात 8,128 शिक्षकांची पदे भरणार | पुढारी

बेळगाव : जिल्ह्यात 8,128 शिक्षकांची पदे भरणार

बेळगाव ; प. य. पालकर :  राज्यात मोठ्या प्रमाणात प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांतील शिक्षकांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. मात्र, सरकारने केवळ 15 हजार शिक्षक भरतीचा निर्णय यापूर्वी घेतला होता. आता राज्यात 1 लाख 88 हजार 532 शिक्षकांची भरती केली जाणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यासाठी 8 हजार 128 शिक्षकांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. खानापूर तालुक्यात1,444 शिक्षकांची भरती केली जाणार आहे. शिक्षक भरतीचा आदेश 29 जुलै रोजी आला आहे.

नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर एज्युकेशनने इयत्ता 1 ते 5 आणि इयत्ता 6 ते 8 वीसाठी नियुक्त शिक्षकांची पात्रता राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या अधिसूचनेनुसार निर्धारित केली आहे.

1967 च्या नियमानुसार विषय शिक्षक भरतीला 2001 पासून प्राधान्य देण्यात आले आहे. सामान्य विज्ञान, इंग्रजी आणि हिंदी या विषयांसाठी चार वर्ग तयार करण्यात आले होते. यामध्ये प्राथमिक शाळा सहाय्यक शिक्षक/शिक्षकांमध्ये बदल करण्यात आला होता. 1967 चे नियम आणि 2001 च्या सुधारित नियमांमध्ये भरतीची पात्रता आणि कार्यपद्धती नमूद केली आहे. वित्त विभागाने प्राथमिक शाळा मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या मंजूर पदांचे मनुष्यबळ शिक्षण हक्क (आरटीआय) कायद्याच्या निकषांनुसार निश्चित केले आहे. सध्या मंजूर पदांची संख्या 2011 मध्ये मंजूर केलेल्या पदांपेक्षा भिन्न आहेे.

दि. 7 सप्टेंबर 2020 च्या आदेशनानुसार इयत्ता पहिली ते आठवीसाठी लागू असलेल्या विज्ञान-गणित विषयाला एकच शिक्षक होता. आता विषय शिक्षक भरतीला प्राधान्य दिल्याने विज्ञान, गणित, इंग्रजी विषय शिक्षकांना उच्च प्राथमिक शाळेत प्राधान्य देण्यात येत आहे. त्यासाठी सीईटी, टीईटी पास होणे गरजेचे आहे.

राज्यातील भरतीची आकडेवारी
मुख्याध्यापक : ……3,396
सह मुख्याध्यापक : …..13,096
प्राथमिक शिक्षक : ….1,12,467
(पहिली ते पाचवी)
उच्च प्राथमिक शिक्षक : .. 51,781
(सहावी ते आठवी)
विषय शिक्षक : ………….6,772
संगीत शिक्षक :…………… 259
चित्रकला शिक्षक :…………222
अंगणवाडी :………………539
एकूण : ………….1,88,532

बेळगाव जिल्ह्यातील भरतीची आकडेवारी
मुख्याध्यापक :……………481
सह मुख्याध्यापक :………..230
प्राथमिक विज्ञान शिक्षक :. 4,976
पदवीधर प्राथमिक शिक्षक :.2,116
क्रीडा शिक्षक :……………..280
विशेष शिक्षक :………………12
अंगणवाडी :…………………23
एकूण :………………..8,128

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात होणारी शिक्षक भरती
तालुका साहाय्यक मुख्याध्यापक प्रा. विज्ञान पदवीधर क्रीडा विशेष अंगणवाडी एकूण
शिक्षक शिक्षक शिक्षक शिक्षक शिक्षक शिक्षक
बेळगाव शहर 15 48 471 224 23 3 4 788
बेळगाव ग्रामीण 50 121 1,021 474 57 2 7 1,732
खानापूर 14 99 956 349 21 1 4 1,444
बैलहोंगल 32 61 588 250 34 1 4 470
कित्तूर 18 33 294 131 23 0 0 503
रामदुर्ग 40 57 697 309 51 3 5 1,162
सौंदत्ती 61 62 949 379 71 2 5 1,529
एकूण 230 481 4,976 2,116 280 12 29 8,128

जिल्ह्यात रिक्त जागांप्रमाणे शिक्षक भरती करण्यात येणार आहे. बेळगाव ग्रामीण व सौंदत्ती तालुक्यात शिक्षकांची पदे रिक्त आहेत. डी. एड्. व बी. एड्.धारकांना शिक्षक होण्याची संधी प्राप्त झाली आहे. यामुळे सरकारी शाळांचा प्राथमिक शिक्षणाचा दर्जा वाढणार आहे.
– बसवराज नलतवाड, जिल्हा शिक्षणाधिकारी

Back to top button