बेळगाव : पतीकडून भर रस्त्यात कोयत्याने वार करून पत्नीचा खून | पुढारी

बेळगाव : पतीकडून भर रस्त्यात कोयत्याने वार करून पत्नीचा खून

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : पत्नीचा कोयत्याने वार करून खून केल्याची घटना शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास किल्ला तलावाजवळील गांधीनगर रोड ब्रिज जवळ घडली. हिनाकौसर मंजूरिलाई नदाफ (वय 30) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. आरोपी पतीला माळमारुती पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हिना कौसर व मंजुरिलाई या दोघांमध्ये गेल्या दोन वर्षापासून घटस्फोटासाठी प्रकरण न्यायालयात आहे. शुक्रवारी कोर्टाची तारीख असल्याने बैलहोंगल येथून मंजूरिलाई बेळगाव मध्ये आला होता. किल्ला तलावाजवळ उद्यानामध्ये बसलेल्या मंजुरिलाईने उज्वलनगरला घरी निघालेल्या पत्नीचा कोयत्याने वार करून खून केला.

आरोपी मंजुरिलाई याने भर रस्त्यात कोत्याने आपल्या पत्नीचा खून केला. यावेळी खून केल्यानंतर तो बराच वेळ तेथेच उभा होता. खून झाल्यानंतर रस्त्यावरुन येणारे जाणारे नागरिक गोळा होऊ लागले. यावेळी रक्ताने माखलेला कोयता हातात घेऊनच तो नागरिकांशी बोलू लागला. त्याने पाठीला एक सॅक अडकवली होती. पुढे त्याने तो कोयता एका कॅरिबॅकमध्ये घातली. हे सर्व दृष्य बघ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आहे. सध्या हा व्हिडिओ अनेक ठिकाणी व्हायरल होत आहे.

अधिक वाचा :

Back to top button