IPL 2022 : सुनील गावस्कर यांचे मोठे विधान; ‘हा’ संघ जिंकू शकत नाही यंदा आयपीएल | पुढारी

IPL 2022 : सुनील गावस्कर यांचे मोठे विधान; ‘हा’ संघ जिंकू शकत नाही यंदा आयपीएल

मुंबई; पुढारी ऑनलाईन : इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL)(IPL 2022)च्या १५ व्या हंगामाला सुरुवात होण्यासाठी आता फक्त २४ तास उरले आहेत. यावेळी चाहत्यांना जबरदस्त थराराची अपेक्षा आहे. यावेळी लीगमध्ये ८ ऐवजी १० संघांचा समावेश करण्यात आला आहे. सर्व संघांनी त्यांच्या खेळाडूंची निवड केली आहे. त्यांच्याकडे सामना जिंकणारे खेळाडू आहेत; पण यंदाच्या आयपीएलमध्ये एक संघ आहे जो यावेळी विजेता ठरु शकणार नाही, असे मोठे विधान भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी केले आहे. आयपीएल सुरु होण्यापुर्वीच त्यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

 सुनील गावस्कर यांना आयपीएलमधील एका संघाबद्दल थोडी काळजी वाटत आहे. त्यांना या संघाबद्दल वाटते की, या वेळीही या संघाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. हा संघ आयपीएलचे (IPL 2022) जेतेपद पटकावण्यात यशस्वी होऊ शकेल, असे वाटत नाही. या संघात प्रभावी खेळाडूंचा अभाव आहे. हा संघ कोणत्याही विरोधी संघाचा खेळ नक्कीच खराब करू शकतो, असे त्याने निश्चितपणे सांगितले असले तरी चषक जिंकण्याची शक्यता कमी दिसत असल्‍याचे म्‍हटलं आहे.

सुनील गावस्कर म्हणाले, “मला वाटत नाही की पंजाबच्या संघात (IPL 2022) असा कोणताही प्रभावशाली खेळाडू आहे जो संघाला चषक जिंकण्यासाठी मदत करू शकेल. परंतु, कधीकधी या गोष्टींचा फायदा देखील होतो.” कारण जेव्हा एखाद्याकडून कोणतीही अपेक्षा नसते. तेव्हा त्या संघावर कोणतेही दडपण असत नाही. विनादडपण खेळले तर कामगिरी चांगली होते, मग कदाचित पंजाबचा संघ आपल्या सर्वांना आश्चर्यचकित करेल, परंतु मला ते चषक जिंकतील, असे मला आत्ता काही वाटत नाही.”

हेही वाचलं का?

Back to top button