

पाचोड प्रतिनिधी,औरंगाबाद : सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव ( ता. पैठण) शिवारात टोमॅटोने भरलेला ट्रक उलटला. याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळावर एकच गर्दी केली. शक्य हाेतील तेवढे टाेमॅटाे नागरिकांनी घरी घेऊन गेले.
आज सकाळी आडवा शिवारात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला. सुदैवाने यात जीवित हानी झालेली नाही. मात्र घटनास्थळी टोमॅटो पडून असल्याने नागरिकांनी घटनास्थळावर एकच गर्दी केली. नेता येईल तेवढे टमाटर नागरिकांनी घरी घेऊन गेले. शिवारात टोमॅटो विखुरलेले. ही घटना पहाटे घडल्याने अनेकांना याबाबत माहिती झाली नाही; पण काही वेळाने नागरिकांना घटनेची माहिती मिळाली.टोमॅटो पडून असल्याने नागरिकांनी घटनास्थळावर एकच गर्दी केली. नेता येईल तेवढे टाेमॅटाे नागरिकांनी घरी घेऊन गेले. अखेर पोलिसांना पाचारण करून सदर प्रकार थांबविण्यात आला. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने ट्रकला बाजूला केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरु झाली.
हेही वाचलंत का?