नाशिक : युवकाचा बचाव केल्याने महिलेच्या डोक्यात कोयत्याने वार, आई व भावालाही मारहाण | पुढारी

नाशिक : युवकाचा बचाव केल्याने महिलेच्या डोक्यात कोयत्याने वार, आई व भावालाही मारहाण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बजरंगवाडीत शुक्रवारी (दि. 21) दोघांनी युवकाला मारहाण करण्यासाठी पाठलाग केला होता. तो जीव वाचविण्यासाठी एका महिलेच्या घरात लपला. त्यामुळे टोळक्याने महिलेसह तिच्या आई व भावावर हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलग दुसर्‍या दिवशी बजरंगवाडी परिसरात टोळक्यांकडून धारदार शस्त्रांचा वापर झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी (दि. 19) रात्री हळदीच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागल्याची कुरापत काढून चौघांनी मिळून संकेत नंदकिशोर तोरडमल (21) याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला होता. या घटनेला काही तास उलटत नाही, तोच संशयित चेतन जाधव व राहुल ब्राह्मणे यांनी परिसरातीलच पिंटू दिवे याला शनिवारी (दि. 21) दुपारी दोनच्या सुमारास मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे पिंटू हा शीतल आत्माराम पुजारी (रा. बजरंगवाडी) यांच्या घरात लपला होता. पिंटूला घरात घेतल्याचा राग आल्याने चेतनने त्याच्याकडील कोयत्याने शीतल यांच्या डोक्यात वार करून गंभीर दुखापत केली. त्यानंतर राहुल ब—ाह्मणेने शीतल यांच्या आईला दगड मारून दुखापत केली. शीतल यांचा भाऊ आला असता, संशयित दमयंती जाधव, संगीता जाधव, शेखर काळे, अभिषेक जाधव, प्रकाश शिंगाडे, अभिषेक ब—ाह्मणे (सर्व रा. बजरंगवाडी) यांनी शीतल यांच्या घराजवळ येत शीतल यांच्यासह त्यांच्या नातलगांना मारहाण केली. यावेळी संशयित अभिषेकने टोकदार हत्याराने शीतलच्या भावावर वार करून दुखापत केली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस अधिक तपास करीत आहेत. पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे.

हेही वाचा :

Back to top button