

लासलगाव ; पुढारी वृत्तसेवा : एकतर्फी प्रेमातून औरंगाबाद (Aurangabad murder) येथील महाविद्यालयीन तरुणीचा गळा चिरून शनिवारी निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपी शरणसिंग सेठी ( वय २०) या माथेफिरू तरुणाला लासलगाव येथून रविवारी (दि.२२) दुपारी अटक करण्यात आली.
(Aurangabad murder) याबाबत अधिक माहिती अशी की, खुनाच्या घटनेनंतर शरणसिंग दुचाकी तेथेच सोडून ट्रकमध्ये बसून लासलगाव येथे राहणाऱ्या बहिणीच्या घरी गेला होता. याबाबतची माहिती वेदांतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी मिळाली. लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस नाईक योगेश शिंदे, पोलीस नाईक संदिप शिंदे, सुजय बारगळ यांनी आरोपीला गणेशनगर , लासलगाव येथून ताब्यात घेतले. आरोपीस पुढील कारवाईसाठी औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सुखप्रितसिंग कौर उर्फ कशीश प्रीतपालासिंग (वय १९) ही देवगिरी महाविद्यालयात बीबीएच्या दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत होती. शनिवारी सकाळी मैत्रीण दिव्या खटलानीसोबत ती कॉलेजला गेली होती. यावेळी आरोपी शरणसिंग सेठी यांने कशीशला एका हॉटेलमध्ये येण्याचा आग्रह केला. मात्र, कशीशने त्यास नकार दिला. त्यामुळे आरोपीने कशीशला २०० फूट दूरपर्यंत ओढत नेऊन तिचा गळा चिरून निर्घृणपणे खून केला. भरदिवसा कॉलेजमध्ये असा प्रकार घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
हेही वाचलंत का ?