संभाजीराजेंना आमचा विरोध नाही, मात्र शिवसेना अपक्षाला पाठिंबा देणार नाही : संजय राऊत | पुढारी

संभाजीराजेंना आमचा विरोध नाही, मात्र शिवसेना अपक्षाला पाठिंबा देणार नाही : संजय राऊत

मुंबई : पुढारी ऑनलाईन संभाजीराजे यांना आमचा विरोध नाही, मात्र शिवसेना अपक्षाला पाठिंबा देणार नाही, असे स्‍पष्‍ट करत राज्‍यसभेच्या दोन्ही जागा शिवसेना लढते आहे. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार  निवडून जातील, असा विश्वासही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज व्यक्‍त केला.

ज्‍यसभेच्या सहाव्या जागेवरून तिढा निर्माण झाला आहे. अपक्ष म्‍हणून निवडणूक लढण्याची घोषणा माजी खासदार संभाजीराजे यांनी केली होती. यांनतर त्‍यांना शिवसेनेकडून निमंत्रण मिळाले होते. शिवेसेनेच्या शिष्‍टमंडळाने त्‍यांची काल रविवारी हॉटेल ट्रायडंट मध्ये भेट घेउन चर्चा केली होती.  आज दुपारी १२ वाजता वर्षा वर या, असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्‍यामुळे संभाजी राजे हे ‘शिवबंधना’त अडकणार की, शिवसेना पुरस्‍कृत उमेदवार होणार हे काही वेळात स्‍पष्‍ट होणार आहे.

यासंदर्भात माध्‍यमांशी बाेलताना संजय राऊत म्‍हणाले की,  राज्‍यसभेच्‍या  दोन्ही जागा शिवसेना लढवणार आहे. आमचा संभाजी राजे यांना विरोध नाही, मात्र आम्‍ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही, असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. संभाजीराजेंनी ४२ मतांची बेगमी केले आहे का ? असा सवालही त्‍यांनी उपस्‍थित केला आहे.

महाविकास आघाडीचे पक्षश्रेष्‍ठी योग्‍य निर्णय घेतील: राजेश टोपे

संभाजीराजे यांच्‍याबद्‍दल आम्‍हाला आदर आहे. पूर्वी ते राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्‍ये होते. कोल्‍हापूर लोकसभा मतदारसंघात ते राष्‍ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारही होते. त्‍यामुळे त्‍यांचे शरद पवार यांच्‍यासह पक्षातील सर्वांशी व्‍यक्‍तिगत संबंध आहेत.  त्‍यांच्‍या राज्‍यसभा उमेदवारीबाबत महाविकास आघाडीचे पक्षश्रेष्‍ठी योग्‍य निर्णय घेतील, असा विश्‍वास आरोग्‍य मंत्री व राष्‍ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी व्‍यक्‍त केले.

हेही वाचा : 

Back to top button