Lok Sabha Election 
Latest

पिगासस प्रकरणी दुसऱ्या दिवशीही गोंधळ?

backup backup

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन: पिगासस फोन हॅकिंग प्रकरणावरन संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गोंधळ झाला.  पिगासस वरून दुसरा दिवसही सरकारची डोकेदुखी वाढवणारा आहे.

आज लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षांनी पिगासस प्रकरणी नोटिसा दिल्याने सरकारसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

अधिक वाचा:

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आज 'पिगासस' फोन हॅकिंगबरोबरच महागाई, पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किंमती, कृषी कायदे यांवरून सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे.

सध्या संसदीय दलाची बैठक सुरू असून या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा उपस्थित आहेत. या बैठकीत पंतप्रधान मोदी मार्गदर्शन करणार आहेत.

अधिक वाचा:

सदन सुरू होण्याआधी काँग्रेस लोकसभा खासदारांची सकाळी १०.३० वाजता सीपीपी कार्यालयात बैठक होणार आहे. 'पिगासस' संदर्भात सरकारला घेरण्यासाठी या बैठकीत रणनीती तयार करण्यात येणार आहे.

अधिक वाचा:

काँग्रेसचे खासदार माणिकम टागोर यांनी 'पिगासस प्रोजेक्ट' मीडिया रिपोर्टच्या मुद्द्यावर लोकसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव दुपारी राज्यसभेत 'पेगासस प्रोजेक्ट' संदर्भात बोलणार आहेत.

आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी राज्यसभेत पिगासस प्रोजेक्ट मीडिया रिपोर्ट संदर्भात राज्यसभेत शून्यकाळ नोटीस दिली आहे.

हेही वाचलेत का: 

पहा व्हिडिओ: नंदवाळमध्ये विठ्ठल कसे प्रकटले

https://youtu.be/vuXFVV0uhNs

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT