मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे स्‍वत: कार चालवत पंढरपूरच्‍या दिशेने रवाना | पुढारी

मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे स्‍वत: कार चालवत पंढरपूरच्‍या दिशेने रवाना

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : आषाढी एकादशी निमित्त पंढपूर विठ्‍ठल मंदिरात मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍या हस्‍ते मंगळवारी पहाटे महापूजा होणार आहे. मात्र मुंबईत दिवसभर कोसळणार्‍या पावासमुळे त्‍यांना  हवाईमार्गाने पंढरपूरला जाणे अशक्‍य झाले. त्‍यामुळे उद्धव ठाकरे हे रस्‍ते मार्गानेच पंढरपूरला रवाना झाले. मागील वर्षी प्रमाणे ते स्‍वत:चालवत पंढरपूरला रवाना झाले.

अधिक वाचा 

  • देहू : ‘ग्यानबा तुकाराम’च्या गजरात तुकोबारायांच्या पादुका पंढरपूरला रवाना
  • हरिनामाच्या गजरात माऊलींच्या चलपादुका पंढरपूरकडे मार्गस्थ

सोमवारी दुपारी साडेतीनच्‍या सुमारास मुख्‍यमंत्री मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा मुंबई-पुणे एक्‍सप्रे वेवरुन पंढपरूच्‍या दिशेने रवाना झाला. स्‍वत: उद्धव ठाकरे हे कार चालवत होते. हा क्षण माध्‍यमांनी टिपला. मागील वर्षीही ते रस्‍ते मार्गानेच पंढरपूरला गेले होते.

मंगळवारी पहाटे २.२० मिनिटांनी होणार्‍या महापुजेला मुख्‍यमंत्री सपत्‍निक उपस्‍थित राहतील.महापुजा झाल्‍यानंतर ते सकाळी ११ वाजता पुन्‍हा मुंबईला रवाना होणार आहेत.

अधिक वाचा 

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्‍या सोबत पोलिसांचीही वाहने आहेत. त्‍यांना झेड प्‍लस सुरक्षा असल्‍याने याची माहिती सोलापूर जिल्‍हा प्रशासनाला देण्‍यात आली आहे.

मागील वर्षीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह पंढरपूरला गेले होते. त्‍यावेळी त्‍यांनी स्वतःच कार चालवली होती. स्‍वत: कार चालवत जाणारे पंढपूरला महापुजेसाठी जाणारे ते पहिले मुख्‍यमंत्री ठरले होते.

कोरोना संकट काळ सुरु झाल्‍यानंतर मंत्रालय व अन्‍य ठिकाणी जाताना उद्धव ठाकरे हे स्‍वत:च गाडी चालवताना दिसतात.

हेही वाचलं का?

Back to top button