नवी दिल्ली ; पुढारी वृतसेवा: भारतीय नौदल ताफ्यात एमएच-६० हेलिकॉप्टर दाखल झाले आहे. यामुळे भारतीय नौदल सामर्थ्यामध्ये आणखी भर पडली आहे.
अधिक वाचा
भारत- अमेरिकेमधील संरक्षण सहकार्य अधिक दृढ करण्याचे संकेत अमेरिकेने दिले आहेत. अमेरिकेच्या नौदलाने एमएच-६० आर बहूउपयोगी हेलिकॉप्टर्स भारतीय नौदलाकडे सुर्पूद केले आहेत. विदेशी सैन्य विक्रीनुसार लॉकहीड मार्टिनची निर्मिती असणार्या २४ हेलिकॉप्टर्स खरेदी केली जाणार आहेत. याची किंमत सुमारे २.४ अब्ज डॉलर आहे.
अधिक वाचा
एनएएस नॉर्थ आयलंडमध्ये झालेल्या कार्यक्रमात अमेरिकेने दोन हेलिकॉप्टर भारताकडे सुर्पूद केले. या वेळी अमेरिकेतील भारतीय राजदूत तरणजीत सिह संधू हे उपस्थित होते.
एमएच-६० हेलिकॉप्टर सर्व हवामानांमध्ये वापर करता येणारे बहू उद्देशीय हेलिकॉप्टर आहे. भारतीय नौदलासाठी याचा वापर होणार आहे. त्याचबरोबर भारत आणि अमेरिकेतील संरक्षण संबंध अधिक दृढ होणार आहेत. भारत-अमेरिकेतील मैत्री नवीन उंचीवर पोहचली आहे, असे संधू यांनी सांगितले.
भारत आणि अमेरिकामधील संरक्षण साहित्य कराराचा विस्तार हा २० अब्ज डॉलरहून अधिक झाला आहे. संरक्षण साहित्य
व्यापाराबरोबरच भारत आणि अमेरिका संरक्षण मुद्यांवर एकत्रीत काम करीत आहे.
अमेरिकेने भारताला दिलेल्या एमएच-६० हे सर्व हवामानांमध्ये वापर करता येणारे बहू उद्देशीय हेलिकॉप्टर आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन याचे डिझायन केले आहे. विशिष्ट उपकरणांसह अत्याधुनिक शस्त्रांनी ते सज्ज आहे. या हेलिकॉप्टरमधील अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करण्यसाठी वैमानिकांची पहिली तुकडी अमेरिकेमध्ये प्रशिक्षण घेत
असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचलं का ?