पुढारी ऑनलाईन डेस्क: दर्जेदार अभिनयाने रसिकांच्या ह्रदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या नसरुद्दीन शहा यांचा आज ७१ वा वाढदिवस. नसरुद्दीन शहा अभिनयाबरोबरच ज्वलंत विषयांवर घेतलेल्या ठाम भूमिकांसाठीही ओळखले जातात.
अधिक वाचा
नसरुद्दीन शहा यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे २० जुलै, १९५० मध्ये सधन कुटुंबात झाला.
अन्य भावांप्रमाणे त्यांनीही मोठ्या पदाची नोकरी करावी अशी घरच्यांची अपेक्षा होती. मात्र, हिंदी सिनेमाच्या वेडापायी त्यांनी अनेक संघर्ष केले.
व्यक्तिगत आयुष्यात नसरुद्दीन यांना अनेक चढउतार आले; पण खंबीर मनाच्या या अभिनेत्याने आपली भूमिका कधीच सोडली नाही.
आपल्यापेक्षा १५ वर्षांनी मोठ्या असलेल्या मनारा सिकरी यांच्याशी विवाहबद्ध झाले.मात्र, त्यानंतर काही वर्षांतच हा विवाह संपुष्टात आला.
यानंतर त्यांनी अभिनेत्री रत्ना पाठक यांच्याशी लग्न केले.
अधिक वाचा:
१९७५ मध्ये निशांत सिनेमामधून त्यांनी सिनेमात एंट्री केली. त्यात एंट्री मिळण्याची कथाही वेगळीच होती. सिनेमांमध्ये काम मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या नसरुद्दीन यांची एक गर्लफ्रेंड होती.
नसरुद्दीन हिंरोसारखे दिसत नाहीत म्हणून तिने ब्रेकअप केला. मात्र, ते हिरोसारखे दिसत नाहीत, म्हणून निशांतमध्ये रोल मिळाला होता.
अधिक वाचा:
निशांत, कथा आणि अन्य समांतर सिनेमांमधून उत्कृष्ट अभियनयाची चुणूक दाखविणाऱ्या नसरुद्दीन शहा यांना ८० दशकात बाॅलीवूटडमधील मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.
जलवा या चित्रपटासाठी त्यांनी भूमिकेची गरज म्हणून शरीक कमवले. या चित्रपटाने त्यांना त्यांना एक लोकप्रिय अभिनेता केले. यानंतर मसाला चित्रपटांमध्येही त्यांनी रंगवलेल्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या.
वय झाल्यानंतर अनेक बोल्ड रोल मिळाले. त्यात डर्टी पिक्चरमधील त्यांचा रोल अप्रतिम होता.
'सात खून', 'बेगम जान', 'डेढ इश्किया' या सिनेमांमध्ये अनेक लव्ह मेकिंग सीन दिले आहेत.
त्यांच्या 'स्पर्श', 'पार' आणि 'इकबाल' या सिनेमांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांनी पाकिस्तानी सिनेमा खुदा मध्येही रोल केला आहे.
नसरुद्दीन शहा सिनेनासृष्टीत संघर्ष करत असताना २० वर्षाच्या वयातच १५ वर्षांनी मोठी असलेल्या मनारा सिकरी यांच्या प्रेमात पडले. मनारा यांना परवीन मुराद नावानेही ओळखले जात होते.
मनाराशी लग्न केल्यानंतर त्यांना एक मुलगी झाली. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. दोघांत खटके उडू लागल्यानंतर त्यांची ओळख रत्ना पाठक यांच्याशी झाली.
ते दोघेही 'संभोगातून समाधीकडे' या सत्यदेव दुबे यांच्या नाटकात काम करत होते. कालांतराने दोघांनी लग्न केले. त्यांना इमाद, विवान अशी दोन मुले आहेत.
अधिक वाचा:
बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्यांनी वर्तमान परिस्थितीवर भाष्य केले आहे.
अनेकजण सरकारच्या बाजूने बोलत असतात मात्र, नसरुद्दीन शहा यांनी अनेक विषयांवर आपले सडोतोड मत व्यक्त केले आहे.
आपले मत कोणतीही किंमत मोजून ते मांडत असतात. नुकतेच दिलीप कुमार यांचे निधन झाल्यानंतर त्यांनी 'दिलीप कुमार हे मोठे अभिनेते होते मात्र, त्यांनी नव्या कलाकारांच्या प्रचारात काहीच योगदान दिले नाही.अभिनयाव्यतिरिक्त अन्य कोणतेही त्यांचे योगदान नाही.' असे वक्तव्य केले होते.
'देशात सर्वांना समान स्थान असावे, मात्र, आज आपल्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्यांना जेलमध्ये टाकले जात आहे. कलाकार, बुद्धीवादी, शायर यांना रोखले जात आहे.
केवळ राष्ट्रवादाच्या नावाखाली द्वेष पसरवून भिंती उभ्या केल्या जात आहे. अनेक निर्देाष लोकांच्या हत्या केल्या जात आहेत. या देशात रहायची भीती वाटते,' असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्याला अजमेर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये प्रचंड विरोध झाला होता. अनेकांनी त्यांचे पोस्टर जाळले होते.
बुलंदशहरमध्ये गोहत्या प्रकरणावरून एका पोलिस अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली होती. त्यावर मत व्यक्त करताना नसरुद्दीन शहा म्हणाले होते, 'मी यावरून चिंतेत आहे की, लोक माझ्या मुलाला विचारतील की, तू हिंदू आहेस की मुस्लिम?'
यावर हरियाणाचे मंत्री अनिल विज यांनी 'तुम्ही काळजी करू नका आम्ही गायीइतकीच माणसांची काळजी घेतो असे वक्तव्य केले होते.
हेही वाचलेत का:
पहा व्हिडिओ: भात लावणीला चांगलाच वेग