पाकिस्‍तानमधील खैबर पख्‍तूनख्‍वा प्रांतात स्‍फोटानंतर बसची झालेली अवस्‍था.  
Latest

पाकिस्‍तानमध्‍ये बॉम्‍बस्‍फोट : चीनच्‍या ९ नागरिकांसह १३ ठार

नंदू लटके

इस्‍लामाबाद ; पुढारी ऑनलाईन : पाकिस्‍तानमध्‍ये आज सकाळी बसमध्‍ये बॉम्‍बस्‍फोट झाला. यामध्‍ये चीनच्‍या ९ नागरिकांसह १३ जण ठार झाले.पाकिस्‍तानमध्‍ये झालेला बॉम्‍बस्‍फोट घटनेची चीनने गंभीर दखल घेतली आहे.

अधिक वाचा 

चिनी अभियंते , भूमि सर्वेक्षण अधिकारी आणि तंत्रज्ञ हे खैबर पख्‍तूनख्‍वा प्रांतातील दासू धरणाच्‍या बांधकामावर जात होते. सकाळी साडेसात वाजण्‍याच्‍या सुमारास बसमध्‍ये स्‍फोट झाला. बसच्‍या इंजिनला आग लागली. बसमध्‍ये चीनचे एकुण ३६ नागरिक होते. ९ जणांचा जागीच मृत्‍यू झाला. जखमींना रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आली आहे. मृतांमध्‍ये पाकिस्‍तान सुरक्षा दलाचे दोन कर्मचार्‍यांचाही समावेश आहे.

अधिक वाचा 

चीनची सरकारी वृत्तसंस्‍था शिन्‍हुआने दिलेल्‍या माहितीनुसार, या स्‍फोटात १३ जण ठार झाले आहेत. ३९ जण जखमी झाले आहेत. यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्‍याने मृतांचा आकडा वाढण्‍याची भीती व्‍यक्‍त होत आहे.

स्‍फोट झालेल्‍या परिसरात नाकाबंदी करण्‍यात आली आहे. दरम्‍यान, हा स्‍फोट नसून अपघात आहे, असा दावा पाकिस्‍तान सरकारने केला आहे. चीनमधील नागरिक ठार झाल्‍याने पाकिस्‍तान कडून ही घटना दडपण्‍याचा प्रयत्‍न होत असल्‍याचा दावा विरोधी पक्ष करीत आहेत.

अधिक वाचा

सध्‍या पाकिस्‍तान 'वन बेल्‍ट वन रोड' या योजनेसह अनेक ठिकाणी वीज निर्माण गृहे आणि धरणांची कामे सुरु आहेत. यामध्‍ये हजारो चिनी अभियंते व अन्‍य कर्मचारी कार्यरत आहेत.

पाकिस्‍तानमध्‍ये वास्‍तव्‍यास असणार्‍या नागरिकांच्‍या सुरक्षेबाबत नुकतीच चीनने चिंता व्‍यक्‍त केली होती. यासंदर्भात इम्रान खान सरकारला सूचनाही केली होती.

चीनने पाकिस्‍तानमधील विविध योजनामंध्‍ये अब्‍जावधी डॉलरची गुंतवणूक केली आहे. मात्र खैबर पख्‍तूनख्‍वा प्रांतातील सीमा भागातील दहशतवादी सक्रीय आहेत. या प्रांतात विविध योजनांच्‍या काम सुरु असून येथील सुरक्षा व्‍यवस्‍थेत वाढ करण्‍यात आली आहे.

चीनची पाकिस्‍तानला तंबी

बुधवारी झालेल्‍या स्‍फोटाची जबाबदारी कोणत्‍याही दहशतवादी संघटनेने स्‍वीकारलेली नाही.या स्‍फोटाला जबाबदार
असणार्‍यावर ठोस कारवाई करा, अशी मागणी चीनचे परराष्‍ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ता झाओ लिजियान यांनी केली आहे.
त्‍याचबरोबर पाकिस्‍तानमधील चिनी नागरिकांच्‍या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करण्‍याची मागणी केली आहे.

हेही वाचलं का ?

पहा व्‍हिडिओ : वंचित मुलांना हक्काचा निवारा देणारं उमेद फाऊंडेशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT