Latest

निशिगंधा वाड साकारणार ‘जय भवानी जय शिवाजी’मध्ये जिजामाता

स्वालिया न. शिकलगार

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : निशिगंधा वाड या जय भवानी जय शिवाजी मालिकेत जिजामाता साकारणार आहेत. निशिगंधा वाड या इतिहासाच्या अभ्यासक आहेत. त्यामुळे जिजाऊ साकारणं हा अत्यंत सुखद अनुभव असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

अधिक वाचा – 

स्टार प्रवाहवर २६ जुलैपासून सुरु होणाऱ्या जय भवानी जय शिवाजी मालिकेत जिजाऊंची भूमिका कोण साकारणार, याची कमालीची उत्सुकता होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. इतकी कणखर भूमिका साकारायला मिळणं हा दैवी योग आहे, असं निशिगंधा वाड म्हणाल्या.

अधिक वाचा – 

निशिगंधा म्हणाल्या,

जवळपास १० वर्षांनंतर निशिगंधा मराठी टेलिव्हिजन करत आहेत. त्‍या म्हणाल्या, हे पात्र साकारताना आणि जिजाऊ यांच्या रुपात उभं करण्यामागे बऱ्याच जणांचे कष्ट आहेत.

अगदी लेखकापासून, दिग्दर्शक, मेकअपमन अशी प्रत्येकाची मेहनत आहे. हे पात्र साकारताना मी कुठेही कमी पडू नये, यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत, असेही त्‍यांनी सांगितले.

अधिक वाचा – 

जय भवानी जय शिवाजी ही मालिका स्टार प्रवाहचा अभिनव उपक्रम आहे. छत्रपती शिवरायांसाठी समर्पण दिलेल्या शिलेदारांची गोष्ट मालिकेच्या रुपात उलगडणार आहे.

मी स्वत:ला भाग्यवान समजते की मी देखील या महत्त्वाकांक्षी मालिकेचा अंश आहे, असे निशिगंधा वाड म्हणाल्या.

२६ जुलैपासून रात्री १० वाजता छत्रपती शिवरायांच्या शिलेदारांची ही गोष्ट भेटीला येणार आहे. या मालिकेतू छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत भूषण प्रधान आहेत. बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका अजिंक्य देव तर नेताजी पालकर यांची भूमिका कश्पय परुळेकर यांनी साकारली आहे. शिवा काशिद यांची भूमिका विशाल निकम यांनी साकारली आहे.

अधिक वाचा – 

पाहा व्हिडिओ -कोल्हापूर शहर महापुराच्या विळख्यात : Flooded Kolhapur City, Drone Video

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT