संग्रहित छायाचित्र 
Latest

नंदुरबार अपघात : प्रवाशांसह क्रुझर दरीत कोसळून ८ जागीच ठार

backup backup

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : नंदुरबार अपघात : जिल्ह्यातील तोरणमाळच्या अतिदुर्गम सिंदिदिगर घाटात प्रवासी वाहतुक करणारी खासगी क्रुझर गाडी दरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

या भीषण अपघातात चार प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या क्रुझर गाडीतून १५ हून अधिक प्रवासी प्रवास करीत होते व ते सर्व जखमी झाल्याचे समजते.

अधिक वाचा 

नंदुरबार अपघात – सहा महिन्यात हा दुसरा भीषण अपघात 

अतिशय खडतर असलेल्या या रस्त्यावर अवघ्या सहाच महिन्यात हा दुसरा भीषण अपघात आहे. विशेष म्हणजे हा सगळा भाग कव्हरेज क्षेत्राबाहेर असल्याने आणि खडतरही असल्याने याठिकाणी मदतकार्य करण्यास अनेक अडथळे निर्माण होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी मध्य प्रदेशच्या बडवानी जिल्ह्यातील एक भजनी मंडळ नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यातील चिखली पुनर्वसन येथे भजनाच्या कार्यक्रमासाठी येत होते.

अधिक वाचा 

हे भजनी मंडळ आणि काही प्रवासी यांचा समावेश असलेली क्रुझर गाडी सिंदिदिगर घाटातून घेऊन जात होती.

यावेळी रविवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात घडला. गाडीतील प्रवासी अक्षरश: फेकले गेले. त्यापैकी ८ जणांचा जागीच मृत्यू झाला.

पोलीस प्रशासन स्थानिकांच्या मदतीने याठिकाणी बचाव कार्य राबवत आहेत. जखमींना तोरणमाळ, म्हसावद याठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात येत आहे.

जिल्हा मुख्यालयातुन पोलिस अधिक्षकांसह अनेक अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.

हे ही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT