कल्याण : रेल्वे ट्रॅकवर थरार; एक्स्प्रेसच्य इंजिन खालून वाचवले आजोबांचे प्राण | पुढारी

कल्याण : रेल्वे ट्रॅकवर थरार; एक्स्प्रेसच्य इंजिन खालून वाचवले आजोबांचे प्राण

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : कल्याण रेल्वे ट्रॅकवर काळजाचा ठोका चुकविणारी घटना घडली. एका एक्स्प्रेसच्या खाली आलेल्या आजोबांचे केवळ इंजिन ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे प्राण वाचले.

कल्याण रेल्वे ट्रॅकवर थरार

रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मुंबईहून वाराणसीला जाणारी महानगरी एक्स्प्रेस कल्याणच्या प्लॅटफॉर्म नंबर 4 वरून सुटली. काही अंतरावर पुढे एक वयोवृद्ध आजोबा रेल्वे रूळ ओलांडत होते. एक्स्प्रेसने अवघ्या सेकंदात वेग घेतला होता.

अधिक वाचा 

कृषी कायदे रद्द करण्यासाठी २२ जुलैला संसदेला घेराव

सिंगल झळकू शकतील Netflix वर : Tinder वर करा राईट स्वाईप

रुळांवर थांबलेल्या आजोबांना पाहून एक्स्प्रेसच्या ड्रायव्हरने वारंवार हॉर्नही वाजवला. मात्र एक्स्प्रेस पुढे येईपर्यंत आजोबा अजिबात जागचे हालले नाहीत. ड्रायव्हरने आपले सर्व कसब आणि अनुभव पणाला लावून एक्स्प्रेसचे ब्रेक दाबले.

तोपर्यंत एक्स्प्रेसच्या इंजिनाचा पुढचा भाग आजोबांच्या अंगावरून गेला होता. मोटरमन आणि रेल्वे पोलिसांनी तातडीने धाव घेऊन इंजिनखाली पाहिले असता आजोबा सुखरूप असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी अत्यंत हळुवारपणे आजोबांना इंजिनाच्या पुढील भागातून बाहेर काढले आणि तातडीने रेल्वे स्टेशनवर घेऊन गेले.

एक्स्प्रेसचे ड्रायव्हर एस. के. प्रधान आणि त्यांचा असिस्टंट रवी शंकर यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक करण्यात येत आहे. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, ही म्हण त्या वृद्धाला लागू पडली.

अधिक वाचा 

इंजिनखाली अडकलेल्या त्या वृद्धाला सुखरूप बाहेर काढण्यात रेल्वे अधिकाऱ्यांना यश आले. इंजिन ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे साक्षात यमाला परत जावे लागल्याची ही घटना होती.

हे आजोबा कोण आहेत, ते रेल्वे ट्रॅकवर कशासाठी आले होते, याची चौकशी लोहमार्ग पोलिसांनी सुरू केली आहे.

महाव्यवस्थापकांकडून इनाम जाहीर

एक्सप्रेस वेगात असतानाही प्रसंगावधान राखून मुंबई-वाराणसी एक्स्प्रेसचे लोको पायलट एस. के. प्रधान, सहाय्यक लोको पायलट रवी शंकर आणि मुख्य मार्ग निरीक्षक संतोष कुमार यांनी रेल्वे मार्गातील मनुष्यहानी रोखण्यात महत्वपूर्ण कामागिरी केली.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अलोक बन्सल यांनी या तिन्ही कर्मचाऱ्यांना रोख दोन हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले. रेल्वे मंत्रालयातील वरिष्ठांनी या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

पाहा फोटोज : प्राजक्ता माळीचे साडीतील फोटोज 

[visual_portfolio id=”7577″]

Back to top button