Tinder शिवाय ‘हे’ डेटिंग ॲप सुद्धा आहेत प्रसिद्ध

tinder
tinder
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जोडीदार शोधण्यासाठी अनेक जण विविध डेटिंग ॲपची मदत घेतात. यासाठी बरेच मोबाईल ॲप उपलब्ध आहेत. यातील सर्वांत प्रसिद्ध ॲप म्हणजे Tinder . तुमच्यातील अनेकांनी Right आणि Left स्वाईप करून Tinder चा वापर केला असेल. अनेकांना यातून जोडिदार भेटलेही असतील पण Tinder च्या जोडीनेच इतरही काही ॲप आहेत, ज्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. त्यातील काही प्रसिद्ध ॲपची ही माहिती.

Bumble

ही अमेरिकेतील कंपनी आहे. या ॲपचं वैशिष्टय् म्हणजे भिन्नलिंगी मॅचमध्ये फक्त महिलाच पहिल्यांदा कॉन्टॅक्ट करू शकतात. तर समलिंगी मॅचमध्ये दोन्हीपैकी कुणीही पहिल्यांदा कॉन्टॅक्ट करू शकतात. Bumble फार कमी वेळातच लोकप्रिय झालेलं आहे.

Hinge

ज्यांना सिरियस रिलेशनशिपमध्ये रस आहे त्यांच्यात Hinge जास्त प्रसिद्ध आहे. Hinge निर्मिती ही दीर्घकालीन (Long Term) रिलेशनशिपसाठी झाली आहे, असं कंपनी सांगते. यात विविध क्विझ असतात, त्याच्या आधारावर तुम्हाला मॅच सुचवली जाते.

Ok Cupid

हे ॲपही अमेरिकेत बनवलं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर विविध प्रश्न विचारले जातात. त्या आधारवर मॅच सुचवली जाते.

Aisle

हे भारतीय डेटिंग ॲप आहे. या Appचा उद्देश सिरियस रिलेशनशिप निर्माण करणे आहे, असं कंपनी सांगते. जगभरातील भारतीय वंशांच्या लोकांना कनेक्ट करण्याच्या उद्देशाने हे ॲप बनले आहे. भारतातील क्रमांक २ चे प्रसिद्ध डेटिंग ॲप म्हणजे Aisle आहे, असा दावा ही कंपनीने केला आहे.

TrulyMadly

या ॲपवर प्रोफाईल व्हेरिफाय करण्याची पद्धत बरीच मोठी आहे. फेसबुक, लिंक्डइन आपण दिलेले फोटो ओळखपत्र यातून हे प्रोफाईल बनवलं जातं. अशा प्रकारे ट्रस्ट स्कोअर बनतो. ठराविक ट्रस्ट स्कोअर झाल्याशिवाय इतर सदस्यांशी संपर्क साधता येत नाही. आपल्या ज्यांच्याशी संपर्क साधता येत नाही, त्यांनी Hide करता येते.

हे ही वाचलत का :

हे पाहा : ज्वालामुखीतून निर्माण झाली घोराडेश्वर डोंगरावरील गुहा…

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news