नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा: तृणमूल काँग्रेसचे सदस्य डेरेक ओब्रायन यांनी केलेल्या 'चाट-पापडी' ट्विटवरुन आज राज्यसभेत गदारोळ झाला. डेरेक ओब्रायन यांनी केलेले 'चाट-पापडी' टिवट हे सभागृहाचा अवमान असल्याचे भाजपचे सभागृह उपनेते मुख्तार अब्बास नकवी यांनी सांगितले. यावरुन राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाल्याने सभागृहाचे कामकाज दुपारपर्यंत स्थगित करण्यात आले.
आज राज्यसभेचे कामकाज सुरु होताच मुख्तार अब्बास नकवी यांनी नियम २३८ चा हवाला देत म्हणाले की, राज्यसभेच्या एका सदस्याने या सभागृहात विधेयक मंजूर होत आहेत की चाटपापड तयार केले जात आहेत, असे टिव्ट केले आहे.
सभागृहात चाटपापडी बनवली जाते का, असा सवालही त्यांनी केला. या टिव्टमुळे सभागृहाचा अपमान होत आहे. एका सदस्याने सभागृहाच्या कामगाजाविषयी अशोभनीय भाषेचा वापर केला असल्याचे नकवी यांनी सांगितले.
या वेळी नकवी यांच्या भूमिकेचे संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी समर्थन केले.
त्यांनी डेरेक ओब्रायन यांच्या चाट-पापडी टिव्टवर आक्षेप घेतला. यामुळे संपूर्ण सभागृहाचा अवमान झाल्याचे जोशी यांनी सांगितले.
सरकार सर्व मुद्यांवर चर्चेस तयार आहे. मात्र विरोधी पक्षांच्या सदस्यांच्या गदारोळामुळे सभागृहाचा वेळ वाया जात असल्याची खंतही जोशी यांनी व्यक्त केली.
राज्यसभेचे कामकाज सुरु होताच पेगासग हिरगिरी प्रकरण, कृषी कायदे यासह विविध मुद्यांवर विरोधी पक्षाच्य सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली.
यावेळी संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी कामकाज सुरु राहण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती केली.
राज्यसभा अध्यक्षांनीही कामकाज सुरु ठेववावे, असे आवाहन केले.
मात्र विरोधकांनी गदारोळ सुरुच ठेवला. यानंतर अध्यक्षांनी १२ वाजेपर्यंतची सभागृहाची कार्यवाही तहकूब केली.
हेही वाचलं का ?