Arrest Lucknow Girl : कॅब चालकाला मारहाण करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल

Arrest Lucknow Girl : कॅब चालकाला मारहाण करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल
Published on
Updated on

लखनौ; पुढारी ऑनलाईन : एका कॅब चालकाला मारहाण केल्याप्रकरणी लखनौ पोलिसांनी एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. ही महिला कॅब चालकाला मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल झाला होता. यावर त्या महिलेवर कारवाई व्हावी अशी जोरदार मागणी होत होती. यावरून ट्विटरवर Arrest Lucknow Girl असा ट्रेंड सुरू होता. उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमधील कृष्णनगरमध्ये ही घटना घडली होती.

Arrest Lucknow Girl : दरम्यान त्या महिलेनेही याबाबत तक्रार केली आहे. कॅब चालक माझ्या अंगावर वाहन घालत असल्याने मी हे कृत्य केल्याचे त्या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. तर कॅब चालकाने या आरोपांचे खंडण केले आहे.

सदर महिला ट्राफिक पोलिसांसमोरच कॅब चालकाला मारत असल्याचा व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

या व्हिडिओत ती महिला ओरडत म्हणते, महिलाच्या अंगावर वाहन घालतोस का?. ती महिला जोरदार मारहाण करताना दिसते.

दरम्यान, कॅब चालक बाजूला असलेल्यांकडून पोलिसांना फोन लावण्याची विनंती करतो.

परंतु त्या महिलेने त्याचा फोन रस्त्यावर आपटल्याची तक्रार कॅब चालकाने दिली.

फोन का तोडलास? हा फोन कंपनीचा आहे. मी त्या ठिकाणी काम करतो. मी गरीब व्यक्ती आहे. या फोनची किंमत २५ हजार आहे त्याचे बिल कोण देणार?. असे कॅब चालक म्हणतो.

दरम्यान, जमलेल्या गर्दीतील एका तरुणाने त्या महिलेला अडवण्याचा प्रयत्न केला.

यावेळी अडवणूक करणाऱ्या तरुणालाही त्या महिलेने मारल्याचे त्या व्हिडिओत दिसत आहे.

तक्रारीवरुन पोलिसांकडून एफआयआर

ही संपूर्ण घटना एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्या व्हिडिओमध्ये महिला रस्त्यावरून चुकीच्या पद्धतीने रस्ता ओलांडत आहे.

सिग्नल सुटल्यानंतर वाहने जोरात जाताना ती महिला मधून जात होती.

यादरम्यान ती महिला कॅबच्या आडवी आल्याने कॅब चालकाने जोरात ब्रेक दाबला. यावर ती महिला काहीही विचार न करता चालकाला मारहाण करू लागली.

यानंतर ती महिला त्या वाहनावर जोरात दगडही मारताना या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

हे ही पाहा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news