मुंबईकरांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या कोस्टल रोडच्या कामात १६०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.
या प्रकरणी कंन्टल्टंटला तातडीने काळ्या यादीत टाकण्यात यावे, या अपहाराची व लुटमारीची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी,
अशी आग्रही मागणी पुन्हा एकदा भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
तसेच केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना पत्र लिहून पर्यावरणाबाबत निकषांचे पालन न केल्या प्रकरणी महापालिकेकडून खुलासा मागावा,
अशी विनंतीही आमदार अँड आशिष शेलार यांनी केली आहे.
अँड. शेलार यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन कोस्टलरोड मधील भ्रष्टाचाराचा आरोप केला.
यापुर्वी त्यांनी ६ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन कोस्टल रोडच्या कामात १००० हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता.
त्याला तातडीने त्याच दिवशी मुंबई महापालिकेने खुलासा करून उत्तर दिले होते.
या खुलाशामध्ये महापालिकेने, या कामात कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचार व अनियमितता न झाल्याचा दावा केला होता.
त्यावर आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन शेलार यांनी काही पुरावे सादर केले.
ते म्हणाले, 'कोस्टल रोड हा भाजपाचा ड्रीम प्रकल्प असून मुंबईला त्याची गरज आहे.
म्हणून तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाच्या परवानग्या तातडीने मिळवून दिल्या.
त्यानंतर मात्र ज्या पद्धतीने काम सुरू आहे त्यावरून कामाचा दर्जा निष्कृष्ट दर्जाचे असून या प्रकल्पाचे भवितव्यच धोक्यात आले आहे.
या प्रकल्पाला भाजपाचा विरोध नसून यातील भ्रष्टाचाराला आमचा विरोध आहे.'
मुंबई महापालिकेतील सत्ताधारी गेले अनेक वर्षे मुंबईतील गल्लीतील रस्त्यांचे डांबरीकरण करून कटकमिशनचा व्यवहार करत आहेत.
तीच कार्यपद्धती याच आंतराष्ट्रीय प्रकल्पाच्या बाबतीत सत्ताधाऱ्यांची असून प्रकल्पाचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे असून प्रकल्पासाठी अत्यंत धोकादायक बाब आहे. 'हे काय तुम्ही करून दाखवताय?' असा सवालही त्यांनी केला.
ही अशीच कार्यपद्धती राहली तर मुंबईकरांच्या १४ हजार कोटी गेले वाहून असे होईल की काय अशी भीती वाटते आहे. हा मुंबईकरांच्या जीवाशी खेळ आहे. हा प्रकल्प व्हावा, अशीच भाजपाची भूमिका असून हा विषय शिवसेनेने प्रतिष्ठेचा करू नये, असेही ते म्हणाले.
हेही वाचा :